ETV Bharat / city

Aaditya Thackeray : औरंगाबादेत आदित्य ठाकरेंची तोफ बंडखोरांवर धडालली; 'सगळे नीट चालले असताना गद्दारी का'

author img

By

Published : Jul 22, 2022, 11:07 PM IST

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरेंची तोफ बंडखोरांवर कडालली

महाविकास आघाडी सरकारने अनेक जनकल्याणकारी योजना मराठवाड्यातच नव्हे तर राज्यभरात आणल्या. ६.५ लाख कोटी रूपयांची गुंतवणुक राज्यात आणली. शिवसेनेचे एकनिष्ठ नेते सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना ८० वर्षे वयात ५० वर्षीय वयातील माणसांसारखे काम केले अशा शब्दात त्यांनी सुभाष देसाई यांचे कौतुक केले. तर 'सगळे नीट चालले असताना गद्दारी का केली? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केला आहे. ( Aaditya Thackeray Criticize shiv sena rebel mla )

औरंगाबाद - नवीन सरकारने पोरकटपणा केला. मागील सरकारच्या काही विकास योजनांच्या निर्णयाला स्थगिती दिली. औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचा संभाजीनगर व धाराशिव असे नामांतर केले, नामांतर करताना जातीत व धर्मात भेदाभेद न करता तसेच कुठलाही वाद न करता सर्वांच्या विश्वासाने हे नामांतर केले. त्यामुळे त्यांच्या पोटात दुःखले असेल. त्यांना दंगली घडवून नामांतर करायचं होत. असा आरोप युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ( Aaditya Thackeray aurangabad ) औरंगाबादेत केला. ( Aaditya Thackeray Criticize shiv sena rebel mla )

आदित्य ठाकरेंची तोफ बंडखोरांवर कडालली

राज्यासाठी काम केले - महाविकास आघाडी सरकारने अनेक जनकल्याणकारी योजना मराठवाड्यातच नव्हे तर राज्यभरात आणल्या. ६.५ लाख कोटी रूपयांची गुंतवणुक राज्यात आणली. शिवसेनेचे एकनिष्ठ नेते सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना ८० वर्षे वयात ५० वर्षीय वयातील माणसांसारखे काम केले अशा शब्दात त्यांनी सुभाष देसाई यांचे कौतुक केले. मराठवाड्यात दुष्काळ होता तेव्हा चारा, पाण्याच्या टाक्या देऊन मदत केली. पालिकेत निधी नसल्याने रस्ते होऊ शकले नाहीत. मात्र आपण ५०० कोटींची कामे मंजूर करून घेतली. पर्यटनासाठी पैसे दिले. अजित पवार यांना सांगून पैसे मंजूर करून आणले. जेवढा कधी निधी मिळाला नाही तेवढा निधी यांना दिला हे मी ठाम पणे सांगेल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

दगा का केला? - सगळ केलं तरी सोडून गेलेले आमदार खोटं बोलतात याची खंत वाटते. सगळे नीट चालले असताना गद्दारी का केली. यानांसर्व दिलं आज लिहून घ्या हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार हे सत्य आहे. शिवसेनेने बद्दल आदर म्हणतात आज त्यांची वाक्य बघा त्यांच्यानातील विष बाहेर येत आहे. इतकं विष कसं आल माहीत नाही. महाराष्ट्र विकास करत होता. यांनी दगा केला कळलं नाही मिठी मारली मात्र यांच्या हातात खंजीर होता. हे माहीत नव्हत. पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली, त्यावेळी गद्दारी करणाऱ्या आमदारांच्या संख्येची जुळवाजुळव सुरु होती. शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे साहेब यांना दोन महिने हलता येत नव्हतं. महाराष्ट्राचे काम थांबू नये म्हणून ते काम करत होते. रोज अपडेट घेत होते. मात्र दुसऱ्या बाजूला गद्दार जमवाजमव करत होते. पक्ष फोडण्याचे धंदे करत होते. पक्ष प्रमुख आपल्या वेदना दूर ठेऊन काम करत होते, तर हे पाप करत होते. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

हेही वाचा - Jayashree Mahajan : 'शिवसेना सोडून शिंदे गटात येण्यासाठी दबाव'; जळगावच्या महापौरांचा गंभीर आरोप

हिंमत असेल तर निवडणुकीला तयार रहा - जिथे गेलात तिथे सुखात राहा, पण राहण्यासाठी आपल्या आमदारकीचे राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा. जनता जे ठरवेल ते मान्य असेल असे आवाहन करत सोबत रहा कामाला जागेल आणि नावालाही अशी भावनिक साद आदित्य ठाकरे यांनी घातली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. शिवसैनिकांची मूठ बांधण्यासाठी युवासेना नेते आदित्य ठाकरे हे शिव संवाद यात्रा करत असुन आज औरंगाबादेत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

सर्वत्र केले जात आहे स्वागत - सर्वच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे लोक दिसले. मी फिरतोय लोक माझं स्वागत करत आहेत. महिला सांगतात आम्ही तुमच्या सोबत आहोत अस सांगतात. नवीन सरकारने पोरकटपणा केला. मागील सरकारच्या काही विकास योजनांच्या निर्णयाला स्थगिती दिली. औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचा संभाजीनगर व धाराशिव असे नामांतर केले, नामांतर करताना जातीत व धर्मात भेदाभेद न करता तसेच कुठलाही वाद न करता सर्वांच्या विश्वासाने हे नामांतर केले त्यामुळे त्यांच्या पोटात दुःखले असेल. त्यांना दंगली घडवून नामांतर करायचं होत. पण महाराष्ट्र शांत राहिला याचा मला अभिमान वाटला. भाषेत, समाजात वाद होऊ दिले नाहीत याला म्हणतात सरकार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचं बंड, उद्धव ठाकरे रणांगणांत; शिवसेनेच्या बांधणीसाठी 20 दिवसांत 13 बैठका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.