ETV Bharat / city

Property Broker Beating Amravati: चार लाखांच्या खंडणी प्रकरणात अमरावतीत प्रॉपर्टी ब्रोकरला मारहाण

author img

By

Published : Sep 17, 2022, 12:18 PM IST

Updated : Sep 17, 2022, 1:04 PM IST

प्लॉट खरेदी-विक्रीत मिळालेल्या कमिशनमधून ४ लाखांची मागणी करीत एका प्रॉपर्टी ब्रोकरला बेदम मारहाण Property Broker Beating Amravati करण्यात आली. ही घटना स्थानिक काँग्रेसनगर मार्गावरील राणा कॉम्प्लेक्ससमोर घडली. Property broker assaulted Amravati याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी Fraserpura Police Station तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. Amravati Crime Info

चार लाखांच्या खंडणी प्रकरणात अमरावतीत प्रॉपर्टी ब्रोकरला मारहाण
चार लाखांच्या खंडणी प्रकरणात अमरावतीत प्रॉपर्टी ब्रोकरला मारहाण

अमरावती : प्लॉट खरेदी-विक्रीत मिळालेल्या कमिशनमधून ४ लाखांची मागणी करीत एका प्रॉपर्टी ब्रोकरला बेदम मारहाण Property Broker Beating Amravati करण्यात आली. ही घटना स्थानिक काँग्रेसनगर मार्गावरील राणा कॉम्प्लेक्ससमोर घडली. Property broker assaulted Amravati याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी Fraserpura Police Station तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. Amravati Crime Info

तिघांविरूध्द फ्रेजरपुरा पोलिसात गुन्हा दाखल- बबलू गाडे (रा. यशोदानगर), कुंदन शिरखे व प्रवीण बनसोड (रा. बेनोडा) या तिघांविरूध्द फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. स्थानिक गुरूकृपा कॉलनी येथील नरेंद्र दामोदर गाडे (वय ५८ वर्ष) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ते प्रॉपट्री ब्रोकर बेनोडा परिसरातील
तीन प्लॉट विकले गेले. त्याचे कमिशन त्यांना मिळाले होते.


कमिशनच्या पैशावरून झाला होता वाद - प्रवीण बनसोड याने त्यांना कमिशनमधील पैशाची मागणी करून वाद घातला होता; परंतु पैसे न दिल्याने बुधवारी दुपारी १२.४५ वाजता नरेंद्र गाडे यांना बोलविण्यात आले. त्याठिकाणी असलेल्या बबलू गाडे याने त्यांना पैशाची विचारणा केली. परंतु पैसे देण्यास नकार देताच बबलू, कुंदन आणि प्रवीण बनसोड या तिघांनी नरेंद्र गाडे यांना मारहाण केली. तसेच यावेळी एका स्टॅम्प पेपरवर अंगठा घेतला व एका इसार चिठ्ठीवर सह्या घेऊन चार लाखांची मागणी केली. यासंदर्भाच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसानी तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Sep 17, 2022, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.