ETV Bharat / city

ST Workers Strike : अमरावतीत खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट; ईटीव्ही भारतचे 'स्टिंग ऑपरेशन'

author img

By

Published : Nov 25, 2021, 9:49 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. खाजगी वाहन चालक प्रवाशांकडून दीडपट ते दुप्पट तिकीट भाडे वसूल करत असल्याचा प्रकार ईटीव्हीच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एसटी बंद असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या प्रवासाचे अतोनात हाल मागील 17 दिवसांपासून सुरू आहेत.

amravati
अमरावती

अमरावती - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (Maharashtra State Transport Corporation) राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन (ST Strike ) सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या कामबंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे. मात्र, या खाजगी वाहन चालकांकडून (Amravati Private Travels) सर्वसामान्य प्रवाशांची प्रचंड लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये समोर आला आहे. या वाहन चालकांनी प्रवाशांकडून दीडपट ते दुप्पट तिकीट भाडे वसूल करत असल्याचा प्रकार ईटीव्हीच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अमरावतीत खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट
एसटी बंद असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या प्रवासाचे अतोनात हाल मागील 17 दिवसांपासून सुरू आहे. परंतु यामध्ये खाजगी वाहन चालक हे मात्र मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची लूट करत आहे. ज्या गावचे एसटीचे तिकीट शंभर रुपये आहे. त्या ठिकाणी दीडशे ते पावणे दोनशे रुपये पर्यंतचे तिकिट हे खाजगी वाहन चालक वसूल करत आहेत. अमरावती ते नागपूर एसटी तिकीट 225 रुपये असताना खाजगी वाहन चालकांकडून 350-500 रुपयांपर्यंत तिकीट वसूल केले जात आहे. तर अमरावती-पुणे यासाठी एसटीकडून 860 रुपये तिकीट आकारले जाते. मात्र, खासगी ट्रॅव्हल्सकडून तब्बल 1700 ते 2000 हजार रुपयांपर्यंत तिकीट वसूल केले जात आहे. यावर मात्र परिवहन विभागाचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे समोर आले आहे.ईटीव्ही भारतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असला तरी अनेक वाहन चालकांकडून मात्र एसटी एवढीच तिकीट ही खाजगी वाहन चालक घेत असल्याचेही समोर आले. अमरावती ते मोर्शी एसटीचे तिकीट 80 रुपये आहे. त्यामुळे काही खाजगी वाहन चालकाही 80 रुपयेच घेत असल्याचेही कॅमेरात कैद झालं. तर काहीच जण मोर्शीसाठी तबल 150 रुपये घेत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झाले.विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा महाविद्यालय सुरू होत आहेत. बाहेर गावचे विद्यार्थी, ग्रामीण भागातील विद्यार्थी एसटी बसचा पास काढून अमरावती शहर गाठत असतात. मात्र, एसटी बस बंद असल्याने या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. दरम्यान खासगी वाहनात दाटीवाटीने बसून जीव मुठीत घेऊन या विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. तसेच खाजगी वाहनचालकांकडून जादा भाडे आकारण्यात येत असल्यामुळे बहुतांश गरीब विद्यार्थ्यांना ते परवडत नाही. त्यामुळे त्यांनी घरी राहण्यास पसंती दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.