ETV Bharat / city

Pedhi River Flooded Due to Heavy Rains : अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पेढी नदीला पूर, अनेक गावांचा तुटला संपर्क

author img

By

Published : Jul 18, 2022, 5:30 PM IST

राज्यात गेली 7 ते 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. रविवारी रात्रीपासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो ( Heavy Rain has been Falling in Amravati ) आहे. सोमवारी पहाटे पावसाचा जोर प्रचंड वाढल्यावर अमरावती शहरालगत वाहणाऱ्या पेढी नदीला पूर आल्याने ( Pedhi River Flooded Due to Heavy Rains ) नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पेढी नदीला पूर आल्यामुळे अमरावती चांदूर बाजार मार्ग बंद झाला ( Amravati Chandur Bazar Route Closed ) आहे.

Pedhi River Floods
पेढी नदीला पूर

अमरावती : अमरावती जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतो ( Heavy Rain has been Falling in Amravati ) आहे. सोमवारी पहाटे पावसाचा जोर प्रचंड वाढल्यावर अमरावती शहरालगत वाहणाऱ्या पेढी नदीला पूर आल्याने ( Pedhi River Flooded Due to Heavy Rains ) नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पेढी नदीला पूर आल्यामुळे अमरावती चांदूर बाजार मार्ग बंद झाला ( Amravati Chandur Bazar Route Closed ) असून, या मार्गावर असणाऱ्या पूजदा, नांदुरा, सलोरा गोपाळपूर हे सर्व पाण्याखाली बुडाले असून, या गावांचा संपर्क तुटला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे या मार्गावरून धावणारी वाहनेदेखील रस्त्यावरच अडकली आहे.

विश्रोळी धरणातील पाणी सोडले : मुसळधार पावसामुळे विश्रोळी धरणात पाणी सोडल्याने पेढी नदीला भीषण पूर आला आहे. पेढी नदीच्या काठावर असणारे सावरखेड कुंड सर्जापूर या गावांचादेखील संपर्क तुटला असून, या गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. गंभीर बाब म्हणजे या गावांना जोडणाऱ्या रस्तादेखील पुरात वाहून गेला असल्यामुळे या गावात मदत कार्य पोहोचविणेदेखील कठीण झाले असून, ग्रामस्थांनादेखील गावाबाहेर येणे अशक्य झाले असताना आता प्रशासनालादेखील या गावांना मदतकार्य पोहोचविण्यास विशेष पथकांचीच मदत घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा : Bus Fell In Narmada River : इंदोरहून अंमळनेरला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.