ETV Bharat / city

माजी मंत्री जगदीश गुप्ता आणि प्रवीण पोटे यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

author img

By

Published : Nov 17, 2021, 3:48 PM IST

शहरात हिंसाचार घडविण्याच्या प्रकरणात आरोपी असणारे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता आणि प्रवीण पोटे यांनी आज शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. शनिवारी भाजपच्या बंद दरम्यान शहरात तणाव निर्माण होऊन हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. पोलिसानी भाजपच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड केली होती.

http://10.10.50.85//maharashtra/17-November-2021/amr-1-police-arestedtopravin-pote-7205575_17112021135929_1711f_1637137769_224.jpg
http://10.10.50.85//maharashtra/17-November-2021/amr-1-police-arestedtopravin-pote-7205575_17112021135929_1711f_1637137769_224.jpg

अमरावती - शहरात हिंसाचार घडविण्याच्या प्रकरणात आरोपी असणारे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता आणि प्रवीण पोटे यांनी आज शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. शनिवारी भाजपच्या बंद दरम्यान शहरात तणाव निर्माण होऊन हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. पोलिसानी भाजपच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड केली होती.

जगदीश गुप्ता आणि प्रवीण पोटे यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
प्रवीण पोटे वकीलांसह पोचले पोलीस ठाण्यातशनिवारपासून पोलीस प्रवीण पोटे यांचा शोध घेत घेत होते. आज आज त्यांचे वकील प्रशांत देशपांडे यांच्यासह शहर कोतवाली पोलिस ठाण्यात पोहोचले. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक तसेच शहरातील काही व्यवसायिक शहर कोतवाली पोलिस ठाण्यात जमले होते.जगदीश गुप्ताही पोचले पोलीस ठाण्यात भाजपचे नेते आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता हे सुद्धा दुपारी 1 वाजता शहर कोतवाली पोलीस ठाण्यात स्वतः हजर झालेत. यावेळी गुप्ता यांचे समर्थक मोठया संख्येने पोलीस ठाण्यात जमले होते.

पोलीस गुप्ता, पोटे यांना न्यायालयात करणार हजर
पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणारे जगदीश गुप्ता आणि प्रवीण पोटे यांना शहर कोतवाली पोलिस आज दुपारी न्यायालयासमोर हजर करणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले भाजपचे नेते आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल बोंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, नगरसेवक तुषार भारतीय यांच्यासह 14 जणांना दोन दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. जगदीश गुप्ता आणि प्रवीण पोटे यांनासुद्धा न्यायालय आज जामिनावर मुक्त करेल असा विश्वास एडवोकेट प्रशांत देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - VIDEO : राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार चार दिवस देवेंद्र फडणवीसांच्या होमपीचवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.