ETV Bharat / city

अमरावतीत शेतकऱ्यांची चिंता वाढली, सोयाबीनवर अळीचे सावट

author img

By

Published : Jun 30, 2021, 5:08 PM IST

हवामान खात्याने दिलेला अंदाजानुसार पश्चिम विदर्भात पाऊस झाला. पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पेरणीची घाई करून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र गेल्या आठवड्यापासून पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांना आता धडकी भरली आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली
शेतकऱ्यांची चिंता वाढली

अमरावती - हवामान खात्याने दिलेला अंदाजानुसार पश्चिम विदर्भात पाऊस झाला. पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पेरणीची घाई करून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र गेल्या आठवड्यापासून पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांना आता धडकी भरली आहे. निघालेल्या त्याचप्रमाणे पेरणी झालेल्या शेतात अळीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

अमरावतीत शेतकऱ्यांची चिंता वाढली, सोयाबीनवर अळीचे सावट

जिल्ह्यात अनेक भागात पावसाची दांडी, बळीराज्याच्या चिंतेत भर

सध्या अमरावती विभागात ६०% पेरण्या झाल्या आहेत. मात्र काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. ही अळी जमिनीतील बियाणे पोखरून काढतात. अळीचा मारा जास्त असल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. एकीकडे जोरदार पावसाची पावसाची प्रतीक्षा लागली असताना शेतकऱ्यांसमोर नवीन संकट येऊन ठेपले आहे.

'जमिनीच्या ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणी करायला हवी'

पश्चिम विदर्भात आतापर्यंत १८४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस यवतमाळमध्ये झाला आहे. सर्वात कमी पाऊस अकोला जिल्ह्यात झाला. कृषी विभागाच्या अहवालानुसार, पश्चिम विदर्भात ३२ लाख २८ हजार हेक्टरच्या तुलनेत १९ लाख ५३ हजार हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी आटोपली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नसतील, तर त्यांनी पेरणी करू नये, पाऊस आणि जमिनीच्या ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणी करायला हवी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

अमरावती विभागात किती पेरणी झाल्या?
अमरावती ५९ टक्के
वाशीम ८७.०१ टक्के
यवतमाळ ७२.४ टक्के
बुलडाणा ५६.४ टक्के
अकोला २४ टक्के

हेही वाचा - रात्र गेली हिशोबात! पोरगं नाही नशिबात; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.