ETV Bharat / city

Convention Of The CPI: डाव्या पक्षांच्या एकजुटीशिवाय भारतात परिवर्तन शक्य नाही -डॉ. भालचंद्र कांगो

author img

By

Published : Sep 18, 2022, 10:56 PM IST

डावे पक्ष हे नेहमी लोकशाही व लोकांना बांधिल आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा येथील गतकाळातील सत्ता त्याचे जीवंत उदाहरण आहे. (Convention Of The CPI) परंतु, तरीही भांडवली पक्ष कम्युनिस्टांना लोकशाहीविरोधी दर्शवून त्यांच्याबद्दल दुष्प्रचार करतात असा आरोप डॉ. भालचंद्र कांगो यांनी केला आहे. ते अधिवेशनात बोलत होते.

डॉ. भालचंद्र कांगो
डॉ. भालचंद्र कांगो

अमरावती - डाव्यांच्या एकजुटीशिवाय भारतात परिवर्तन शक्य नाही, असे सांगत एकजुटीसाठी भाकप नेहमीच पुढाकार घेणारा पक्ष आहे. तसेच, डावे पक्ष हे नेहमी लोकशाही व लोकांना बांधिल आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा येथील गतकाळातील सत्ता त्याचे जीवंत उदाहरण आहे. परंतु, तरीही भांडवली पक्ष कम्युनिस्टांना लोकशाहीविरोधी दर्शवून त्यांच्याबद्दल दुष्प्रचार करतात असा आरोप डॉ. भालचंद्र कांगो यांनी केला आहे. तसेच, सध्या देशात ‘हम दो-हमारे दो’ अर्थात मोदी-शहा आणि अदानी-अंबानी यांचे सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. (convention of the Communist Party of India) ते अमरावती येथे आज रविवार (दि. 17 सप्टेंबर)रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तीन दिवसीय 24 व्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलत होते.

कामगार, तरुण, विद्यार्थी दुर्लक्षित - यावेळी, मोदी सरकारने देशभरातील युवकांना रोजगार न देता धर्म आणि अंमली पदार्थाच्या नशेत गुंतून रहायला भाग पाडले असा घणाघात ‘आयटक’च्या राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड अमरजीत कौर यांनी केला आहे. कौर यांनी केंद्र सरकारच्याच ‘सीएमआय’ अहवालाचा हवाला दिला आहे. शिकून ग्रॅज्युएट झाल्यानंतरही रोजगार न मिळालेल्या देभरातील तरुण विद्यार्थ्यांची संख्या ९० टक्के आहे. त्याचवेळी एकूण आत्महत्यांमध्ये 25 टक्के आत्महत्या या हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांच्या होत असल्याचेही त्यांनी सरकारी अहवालाच्याच आधारे स्पष्ट केले. त्यामुळे हा देश केवळ अदानी-अंबानींना मोठे करणाऱ्यांसाठी चालविला जात असून शेतकरी, कामगार, तरुण, विद्यार्थी अशा इतर घटकांना पूर्णत: दुर्लक्षित ठेवले जात आहे असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

उपस्थिती - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कानगो, राज्यसचिव तुकाराम भस्मे, सहसचिव सुभाष लांडे, महिला फेडरेशनच्या स्मीता पानसरे व साधना गायकवाड, आयटकचे सुकुमार दामले व श्याम काळे, डॉ. रतिनाथ मिश्र, स्वागताध्यक्ष प्रा. साहेबराव विधळे तथा माकप, शेकाप, लाल निशान पार्टी आदींचे प्रतिनिधी मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर यांनी केले तर संचालन एआयएसएफचे माजी राज्यसचिव सागर दुर्योधन यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.