ETV Bharat / city

Amravati Minor Student Suspicious Death : अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमधील वसतिगृहात विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

author img

By

Published : Jul 23, 2022, 7:54 AM IST

अमरावतीमधील विद्या भारती शिक्षण संस्थेद्वारा ( Vidya Bhaarti Shikshan Sanstha ) संचलित वसतिगृहात राहणाऱ्या आदर्श कोगे ( Aadarsh ​​Koge Student ) या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अल्पवयीन विद्यार्थी अवघ्या 12 वर्षांचा होता. आदर्शचा मृत्यू नाक व तोंड दाबून ठेवल्याने श्वास गुदमरून झाल्याचे फोरेन्सेक चाचणीच्या ( Forensic Testing ) अहवालात निष्पन्न झाले आहे.

Amravati Crime News
अमरावती गुन्हे वार्ता

अमरावती : रामपुरी कॅम्पस्थित विद्याभारती शिक्षण संस्थाद्वारा ( Vidya Bharti Shikshan Sanstha ) संचालित आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहात राहणाऱ्या आदर्श कोगे ( Aadarsh ​​Koge Student ) या १२ वर्षीय विद्यार्थाचा गुरुवारी पहाटेच्या सुमारास वसतिगृहातच संशयास्पद स्थितीत मृत्यू ( Suspicious Death ) झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आदर्शचा मृत्यू हा नाक व तोंड दाबून ठेवल्याने ( Pressure on his Nose and Mouth ) श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल ( Forensic Testing ) आज सायंकाळच्या सुमारास प्राप्त झाला आहे. चौकशीसाठी वसतिगृह अधीक्षकाला ताब्यात घेणार आले आहे.




काय आहे प्रकरण : आदर्श नितीन कोगे (वय १२ वर्ष, रा. क जामलीवन रा. चिखलदरा) हा विद्यार्थी सातव्या वर्गात शिकत होता. माझे काही विद्यार्थ्यांसॊबत भांडण झाले असून, त्यांनी मला मारले आहे, असा मॅसेज आदर्शने बुधवारी दुपारी २ च्या सुमारास वडिलांना केला. हा संवादच कुटुंबीयासोबतचा शेवटचा संवाद ठरला. त्या रात्री तो झोपी गेला तो कायमचाच. दुसऱ्या दिवशी सकाळी आदर्श झोपेतून उठत नाही, असा माहिती त्यांनी अधीक्षकांना देण्यात आली. पण, त्यांनी त्याकडे थोडे दुर्लक्ष केले. सकाळी ७ च्या सुमारास सुधीर हेडाऊ हे शिक्षक मंडळी आली असता, त्यांनीही त्याला उठवायचा प्रयत्न केला. त्यांनी तातडीने त्याला खासगी इस्पितळात दाखल केले. परंतु, तेथील डॉक्टरांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. आदर्शला सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वसतिगृह अधीक्षकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : आदर्शच्या वडिलांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, वसतिगृह अधीक्षक रवींद्र तिखाडेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आदर्शचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे नेण्यात आला होता. त्याचा शवविच्छेदन अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून नाक, तोंड दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. वसतिगृह अधीक्षक रवींद्र पांडुरंग तिखाडे (वय ५० वर्षे रा. सोनल कॉलोनी, अमरावती) याच्या वर भा.दं.वि. ३०२ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू असल्याची माहिती गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांनी दिली. आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्याचा उत्सव संपूर्ण भारतभर साजरा होत असतानाच दुसरीकडे एका आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला.

हेही वाचा : Nana Patole Reaction : मुंबईची ओळख पुसण्याचा नवीन सरकारचा प्रयत्न : नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.