ETV Bharat / city

अमरावती : परतवाडा-अंजनगाव मार्गावर ट्रकने चिरडल्या शंभर मेंढ्या

author img

By

Published : Nov 9, 2021, 12:52 PM IST

परतवाडावरून अंजनगाव सुर्जीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्यावर आलेल्या सुमारे शंभर मेंढ्या चिरडल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास सावळी दातुरा या गावालगत झालेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अमरावती : परतवाडा-अंजनगाव मार्गावर ट्रकने चिरडल्या शंभर मेंढ्या
अमरावती : परतवाडा-अंजनगाव मार्गावर ट्रकने चिरडल्या शंभर मेंढ्या

अमरावती : परतवाडावरून अंजनगाव सुर्जीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्यावर आलेल्या सुमारे शंभर मेंढ्या चिरडल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास सावळी दातुरा या गावालगत झालेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अमरावती : परतवाडा-अंजनगाव मार्गावर ट्रकने चिरडल्या शंभर मेंढ्या
राजस्थानातील मेंढपाळांवर दुःखाचा डोंगरराजस्थान येथील मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन घेऊन जिल्ह्यात आले आहे. मेंढ्यांना चारापाणी मिळेल अशा ठिकाणी मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा आखर बसवतात. अनेक गावातील शेतकरी आपल्या शेतात खत मिळेल म्हणून मेंढ्यांचा आखर बसविण्यासाठी मेंढपाळांना पैसेही देतात. अशाच एका शेतात जाण्यासाठी मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन घेऊन निघाले असताना महामार्गावर अचानक भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या शंभर मेंढ्या चिरडल्या. यामुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.रस्त्यावर रक्त आणि मासांचा सडामेंढ्या ट्रकखाली चिरडल्याने सावळी दातुरा गावानजीक रस्त्यावर मेंढ्यांच्या रक्ताचा आणि मांसांचा सडा पडला होता. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. मेंढ्यांना चिरडणारा हा ट्रक राजस्थानमधूनच आला होता अशी माहिती समोर येत आहे.या मार्गावर दोन वर्षांत 15 भीषण अपघातपरतवाडा अंजनगाव या मार्गाचे विस्तारीकरण दोन वर्षांपूर्वी झाले आहे. दोन वर्षांत या मार्गावर 15 भीषण अपघात झाले आहेत. मार्गावर ज्या ठिकाणी अपघाताची भीती आहे त्या ठिकाणी गतिरोधक लावण्याची मागणी अनेकदा केली असली तरी या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले असे सावळी दातुरा गावचे सरपंच मनोहर बहुराशी यांनी म्हटले आहे. अनेक गावांलगत रस्त्यावर कठडे बांधण्याची गरज असतानाही कठडे बांधण्यात आले नाही असे ते म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.