ETV Bharat / city

Amaravati Crime : अमरावतीत 4.40 लाख रुपयांचा ड्रग्स साठा जप्त

author img

By

Published : Mar 24, 2022, 3:35 PM IST

नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाकिजा कॉलनी येथे सात महिन्यापूर्वी 25 ऑगस्ट 2019 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने 16.530 ग्राम मेफोड्रोन हे ड्रग्स जप्त केले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मात्र हे ड्रग्स अमरावती नेमके कुठून येत आहे याचा उलगडा होऊ शकला नव्हता.

Amaravati Crime
Amaravati Crime

अमरावती - अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गौस नगर येथील एका घरातून 88 ग्रॅम मेफोड्रोन हे ड्रग्स जप्त करण्यात आले. या ड्रग्सची किंमत 4.40 लाख रुपये इतकी आहे. या ड्रग्स यासोबतच पोलिसांनी दोन लाख 43 हजार रुपये रोख देखील जप्त केली आहे.

अमरावतीत ड्रग्स साठा जप्त

अशी झाली कारवाई
नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये मेफेड्रोन हे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यावेळी या परिसराकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिले होते. नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी ताफ्यासह गौस नगर येथील एका घरावर बुधवारी सायंकाळी धाड टाकली. या घरात असणाऱ्या महिलेकडून 4.40 लाख रुपयांचे मेफोड्रोन हे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या महिलेने भाड्याने घेतलेल्या लगतच्या दुकानाचीही पोलिसांनी झडती घेतली. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे.

सात महिन्यापूर्वीही कारवाई मात्र सूत्रदाराचा उलगडा नाही
नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाकिजा कॉलनी येथे सात महिन्यापूर्वी 25 ऑगस्ट 2019 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने 16.530 ग्राम मेफोड्रोन हे ड्रग्स जप्त केले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मात्र हे ड्रग्स अमरावती नेमके कुठून येत आहे याच्या सोर्सचा उलगडा मात्र होऊ शकला नव्हता.

पानमसाल्यावर होतो वापर
मेफोड्रोन या ड्रग्सचा वापर विड्याच्या पानात तसेच पान मसाल्यात केला जातो. या ड्रेसचे सेवन जीवघेणे असून शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना टार्गेर करून हे ड्रग्स विकले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - Two Child Died : निकृष्ट सिमेंटचा खांब तुटला अन् होत्याचे नव्हते झाले, काळीज पिळवटून लावणारी घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.