ETV Bharat / business

तुमचा यूपीआय (UPI) आयडी बंद होईल का? सरकारने दिली ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 2:17 PM IST

UPI New Rules in 2024 : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत तुमचा UPI सक्रिय नसल्यास तो सक्रिय करावा लागेल, अन्यथा नवीन वर्षापासून तुम्ही Google Pay, Paytm किंवा Phonpe सारख्या अॅप्सद्वारे UPI पेमेंट करू शकणार नाही.

UPI New Rules in 2024
यूपीआय (UPI) आयडी

हैदराबाद : यूपीआय (UPI) ने लोकांचे पैसे व्यवहार करण्याची पद्धत बदलली आहे. लहान ते मोठ्या रकमेचे पेमेंट UPI द्वारे केले जात आहे. रिक्षा आणि मेट्रोच्या प्रवासासाठी देखील लोक बहुतेक UPI द्वारे पैसे भरतात. मात्र आता सरकारने याबाबत एक खास सूचना शेअर केली आहे. तुम्हीही यूपीआय वापरत असाल तर तुम्हाला हे ठाऊक असले पाहिजे, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.

तुमचा UPI बंद होईल ? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 7 नोव्हेंबर 2023 रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांत असे म्हटले आहे की, जर एखाद्या ग्राहकाने गेल्या एक वर्षभरात Google Pay, Paytm किंवा Phonpe सारख्या कोणत्याही थर्ड पार्टी अॅपद्वारे कोणताही व्यवहार केला नसेल तर त्याचा UPI आयडी बंद केला जाईल.

३१ डिसेंबरपर्यंत वेळ : अशा ग्राहकांचा शोध घेण्याच्या सूचना एनपीसीआयने सर्व बँकांना दिल्या आहेत. 31 डिसेंबर 2023 पर्यंत असा कोणताही UPI आयडी सक्रिय न झाल्यास तो 1 जानेवारी 2024 पासून निष्क्रिय केला जाईल, असे मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे. याचा अर्थ असा की तुम्ही कोणतेही UPI व्यवहार करू शकणार नाही. या कारणास्तव, जर तुम्ही गेल्या एक वर्षापासून UPI ​​आयडीद्वारे व्यवहार केले नसेल, तर लगेच UPI आयडी सक्रिय करा.

NPCI च्या या नियमाचा काय फायदा होणार? NPCI च्या नवीन नियमांनुसार, सर्व थर्ड पार्टी अॅप प्रदाते आणि बँका अशा ग्राहकांशी संबंधित UPI आयडी आणि मोबाईल नंबरची पडताळणी करतील. एका वर्षापासून या आयडीवरून कोणताही UPI व्यवहार झाला नसेल, तर तो 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होईल म्हणजेच नवीन वर्षापासून तुम्ही UPI द्वारे कोणतेही व्यवहार करू शकणार नाही. NPCI च्या या नियमामुळे UPI व्यवहार आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील आणि चुकीचे व्यवहारही थांबतील.

चुकीचे व्यवहार कसे थांबणार? अनेक वेळा असे दिसून येते की लोक आपला नंबर बदलतात आणि UPI आयडी निष्क्रिय करायला विसरतात. अशा परिस्थितीत चुकीच्या व्यवहारांचा धोका वाढतो. मात्र, NPCI च्या नियमामुळे UPI द्वारे चुकीचे व्यवहार रोखता येतील.

हेही वाचा :

  1. नवीन वर्षात गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या कोणत्या कंपनीकडे किती भांडवल? कोण आहे सर्वात श्रीमंत?
  2. रतन टाटा यांचा वाढदिवस विशेष; स्वातंत्र्यापूर्वीपासूनच टाटा कुटुंब कॉर्पोरेट जगतात
  3. 2024 च्या सुट्ट्यांचे कॅलेंडर; शेअर बाजारात 14 दिवस सुट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.