ETV Bharat / business

Today Gold Silver Rate: सोन्यातील गुंतवणुक फायदेशीर ठरणार का? जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर

author img

By

Published : Feb 12, 2023, 6:42 AM IST

डॉलरच्या वाढीमुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात चांदीच्या किंमती 6,500 रुपयांनी घसरल्या आहेत. तर सोन्याचा भाव 2,300 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला. आज १2 फेब्रुवारी रोजी सोन्या चांदीचे दर काय आहेत, ते जाणून घेवू या.

Today Gold Silver Rate
आजचे सोन्या चांदीचे दर

मुंबई : मागील काही दिवस सोने-चांदीच्या दराला झळाळी मिळाली होती. सातत्याने सोने चांदीने विक्रमी दर गाठले होते. मात्र, शनिवारी सोने चांदीच्य़ा दरात अल्प घट नोंदवली गेली होती. शुक्रवारी सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा भाव 57,538 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदीचा भाव 67,516 रुपये प्रति किलो होता. शनिवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,310 रुपये होता. सोन्यात 550 रुपयांची घसरण झालेली दिसून येत आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,450 रुपये आहे. शुक्रवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या किमतीत ५५० रुपयांनी घट झाली होती. २४ कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमचा व्यवहार ५७,१६० रुपयांवर झाला होता. चांदीच्या भावातही ५५० रुपयांनी घट झाली होती.

Today Gold Silver Rate
आजचे सोन्या चांदीचे दर

22 कॅरेट सोन्याची किंमत : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,260, 8 ग्रॅम ₹42,080, 10 ग्रॅम ₹52,600, 100 ग्रॅम ₹5,26,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,738, 8 ग्रॅम ₹45,904, 10 ग्रॅम ₹57,380, 100 ग्रॅम ₹5,73,800 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर, प्रमुख शहरात आजची किंमत, कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,400, मुंबईत ₹52,600, दिल्लीत ₹52,750, कोलकाता ₹52,600, हैदराबाद ₹52,600 आहेत.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

चांदीचे आजचे दर : चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹70.50, 8 ग्रॅम ₹564, 10 ग्रॅम ₹705, 100 ग्रॅम ₹7,050, 1 किलो ₹70,500 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर चेन्नईत ₹727, मुंबईत ₹705, दिल्लीत ₹705, कोलकाता ₹705, बंगळुरू ₹727, हैद्राबाद ₹727 आहेत. केरळमध्ये ₹727, पुण्यामध्ये ₹705 आहे.

24 कॅरेट सोने दमदार : काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9 टक्के इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

हेही वाचा : Today Love Rashi : 'या' राशीच्या जोडप्यांनी स्पेशल साजरा करावा 'हग डे', होईल हे फायदे; वाचा, लव्हराशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.