ETV Bharat / business

Finance Minister on  Budget : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे 2023-24 च्या अर्थसंकल्पाबाबत मोठे विधान

author img

By

Published : Oct 12, 2022, 6:37 PM IST

निर्मला सीतारामन ( Nirmala Sitharaman in Washington ) म्हणाल्या, आगामी अर्थसंकल्पाबाबत ( Nirmala Sitharaman Made a Big Statement ) काही विशिष्ट सांगणे खूप घाईचे आहे आणि ते ( Union Budget 2023-24 ) कठीणही आहे. परंतु, व्यापकपणे बोलायचे ( Nirmala Sitharaman Came to Attend Meeting of IMF ) झाल्यास, देशाच्या उत्पन्नवाढीला प्राधान्यक्रम देणे सर्वात महत्त्वाचे राहील. ( Indias Next Annual Budget ) महागाईच्या चिंतेलाही सामोरे जावे लागेल.

Finance Minister Nirmala Sitharaman
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे 2023-24 च्या अर्थसंकल्पाबाबत मोठे विधान

वॉशिंग्टन : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ( Nirmala Sitharaman in Washington ) मंगळवारी ( Nirmala Sitharaman Made a Big Statement ) सांगितले की, भारताचा पुढील वार्षिक अर्थसंकल्प अतिशय काळजीपूर्वक तयार ( Union Budget 2023-24 ) करावा लागेल. जेणेकरून देशाच्या विकासाचा, उत्पन्नाचा वेग कायम ( Indias Next Annual Budget ) राहील. त्याचबरोबर यामुळे महागाईच्या चिंतेला तोंड देण्यासही मदत होईल, असेसुद्धा त्या म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या ( Nirmala Sitharaman Came to Attend Meeting of IMF ) वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी वॉशिंग्टन डीसी येथे आलेल्या अर्थमंत्र्यांनी येथील ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रख्यात अर्थतज्ज्ञ ईश्वर प्रसाद यांच्याशी संवाद साधताना एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

उत्पन्न वाढीला महत्त्व : सीतारामन म्हणाल्या, आगामी अर्थसंकल्पाबाबत काही विशिष्ट सांगणे खूप घाईचे आहे आणि ते कठीणही आहे. परंतु, व्यापकपणे बोलायचे झाल्यास, उत्पन्न वाढीचे प्राधान्यक्रम सर्वात वरच राहतील. महागाईच्या चिंतेलाही सामोरे जावे लागेल. पण, मग वाढ कशी टिकवणार, असा प्रश्न निर्माण होईल. फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची तयारी डिसेंबरपासून सुरू होते. ते म्हणाले, साथीच्या आजारातून सावरल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेली गती पुढील वर्षातही कायम राहावी यासाठी त्यांच्यात संतुलन कसे साधायचे हे पाहणे बाकी आहे. त्यांना पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत ( Finance Minister Nirmala Sitharaman on Budget ) अनेक प्रश्न विचारण्यात आले.

विकासाचा वेग कायम ठेवण्यावर भर : त्यामुळे विकासाचा वेग कायम ठेवता येईल, अशा पद्धतीने हा अर्थसंकल्प अत्यंत काळजीपूर्वक तयार करावा लागेल, असे अर्थमंत्री म्हणाल्या. एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, जे स्टार्टअप देश सोडण्याचा विचार करीत आहेत. त्यांच्याशी सरकार बोलण्यास तयार आहे आणि त्यांच्या समस्या अशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करेल की, त्यांना देशात त्यांचा पाया टिकवून ठेवण्यास मदत मिळेल. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः स्टार्टअप्सशी संवाद साधला आहे. सरकारी धोरणांमुळे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी आज भारतात 100 हून अधिक युनिकॉर्न आहेत.

स्टार्टअप सोबत संवाद साधणार : अर्थमंत्री म्हणाल्या, मी पंतप्रधान आणि स्टार्टअप यांच्यात संवाद साधला आहे. त्यांना भारताकडून काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या समस्या दूर करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. हेच कारण आहे की, 2020 ते 2021 या काळात केवळ एका वर्षात युनिकॉर्नची संख्या 100 वर पोहोचली आहे. “मी इतरांकडून ऐकले आहे की ते (स्टार्ट-अप) सिंगापूर, यूएईला जात आहेत. जर त्यांना भारत सरकारशी बोलायचे असेल आणि आम्ही सिंगापूरला जात आहोत, पण तुम्ही तसे कराल तर आम्ही आनंदाने येथे राहू, मग आम्ही जे शक्य होईल ते करू.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.