ETV Bharat / business

Diwali Muhurat Trading 2023 : लक्ष्मीपुजनाच्या दिवशी आज सकाळी नव्हे संध्याकाळी उघडतो शेअर बाजार, जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंग

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 12:58 PM IST

Updated : Nov 12, 2023, 12:52 PM IST

Diwali Muhurat Trading 2023
मुहूर्त ट्रेडिंग

Diwali Muhurat Trading 2023 : दिवाळीच्या मुहूर्तावर देवाण-घेवाण करण्याचा ट्रेंड पूर्वीपासून सुरू आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, मुहूर्ताचा व्यापार हा पूर्णपणे परंपरेशी जोडलेला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी दिवाळीचा दिवस खूप खास असतो. या दिवशी शेअर बाजार सकाळी नव्हे तर संध्याकाळी एक तास उघडतो. याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात.

हैदराबाद : आजपासून दिवाळीच्या सणाला सुरूवात झाली आहे. पण शेअर बाजारातील खेळाडूंनी या दिवसाची तयारी आधीच सुरू केली आहे. दिवाळीला शेअर बाजार बंद असला तरी मुहूर्त ट्रेडिंग फक्त एक तासासाठी केलं जातं. दिवाळीच्या मुहूर्तावर देवाण-घेवाण करण्याचा ट्रेंड 1957 पासून सुरू आहे. या दिवशी शेअर बाजार संध्याकाळी एक तास उघडतो. या एक तासाच्या मुहूर्तावर गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करून बाजारातील परंपरेचे पालन करतात. लोकांचा असा विश्वास आहे की मुहूर्ताच्या व्यापारात स्टॉक खरेदी केल्यानं त्यांना वर्षभर नफा मिळतो. शेअर बाजाराशी संबंधित व्यापारी दिवाळीच्या दिवशी नवीन खाती उघडतात.

जाणून घ्या 'या' दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंग कधी सुरू होईल ? दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर मुहूर्त व्यापार सत्र साधारणपणे संध्याकाळी आयोजित केले जातात. या दिवशी सर्व एक्सचेंज व्यवसायासाठी बंद असतात. बाजार परंपरेनुसार मुहूर्ताच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारपेठा केवळ दीड तासाच्या कालावधीसाठी खुल्या असतात. NSE ने 12 नोव्हेंबर (रविवार) म्हणजेच दिवाळीला होणाऱ्या विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्राच्या वेळा जाहीर केल्या आहेत.

ट्रेडिंग किती वाजता सुरू होईल :

  • ब्लॉक डील सत्र- 17:45 तास ते 18:00 तास
  • प्री-ओपन सेशन: 18:00 ते 18:08
  • सामान्य बाजार सत्र: 18:15 तास ते 19:15 तास
  • कॉल ऑक्शन इलिक्विड सेशन: 18:20 तास ते 19:05 तास
  • लोडिंग सत्र: 19:25 ते 19:35

यावेळी मार्केट कसे असेल ? या वर्षीच्या मुहूर्तावर गुंतवणूकदारांनी काय अपेक्षा ठेवाव्यात? भारतीय शेअर्सबाबत त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. अमेरिकेकडून व्याजदर शिगेला पोहोचतील असे संकेत मिळत आहेत, यामुळे बाजारालाही आधार मिळेल. त्या काही महिन्यांत सोने आणि इक्विटी बाजार दोन्ही चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. जर अमेरिकेची अर्थव्यवस्था 2024 मध्ये मंदीत गेली तर सोन्याची कामगिरी थोडी चांगली होऊ शकते. भारतीय शेअर बाजार परताव्याच्या बाबतीत सोन्याबरोबरच जागतिक बाजारालाही मात देऊ शकतो.

हेही वाचा :

  1. Share Market Opening : मुंबई शेअर बाजार 4 दिवसांच्या पडझडीनंतर आज तेजीत; काय आहे सध्याची स्थिती, वाचा सविस्तर
  2. Dhantrayodashi 2023 : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? 'या' गोष्टींची घ्या काळजी
  3. Dhantrayodashi 2023 : धनत्रयोदशी बंपर ऑफर! 'या' ब्रँडच्या सोनं, चांदी आणि हिऱ्यांच्या खरेदीवर मिळणार मोठी सूट
Last Updated :Nov 12, 2023, 12:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.