ETV Bharat / business

Disney Layoff 7000 Employees : डिस्नेने 7000 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, सदस्य कमी झाल्याने कर्मचाऱ्यांची कपात

author img

By

Published : Feb 9, 2023, 1:05 PM IST

अनेक कंपन्यांमध्ये टाळेबंदीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये डिस्नेचे आणखी एक नवीन नाव जोडले गेले आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या 7000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याआधी अ‍ॅमेझॉन, गुगल, स्पॉटीफाय तसेच डेलने कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

Disney Layoff 7000 Employees
डिस्नेने 7000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला

नई दिल्ली : अनेक टेक दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात आता मनोरंजन कंपन्यांचाही समावेश व्हायला सुरूवात झाली आहे. डिस्नेने आपल्या 7 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी ही माहिती दिली. इगर यांनी गेल्या वर्षीच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. आर्थिक मंदीची स्थिती लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे इतर कंपन्या झूम, मायक्रोसॉफ्ट, डेल, बायजू खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांना कामावरून कमी करत आहेत.

डिस्ने प्लसच्या सदस्यांमध्ये घट : डिस्ने प्लसच्या सदस्यांमध्ये 1 टक्क्यांची घट दिसून आली आहे. 31 डिसेंबर 2022 पासून आत्तापर्यंत कंपनीचे एकूण सदस्य 168.1 दशलक्ष इतके कमी झाले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीला 1 बिलियन डॉलरचा मोठा तोटा झाला होता. डिसेंबरमध्ये, नेटफ्लिक्स वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाली होती. तर डिस्ने प्लसने त्याचे सदस्य गमावले होते. नेटफ्लिक्सने खर्च कमी करण्यासाठी टाळेबंदीऐवजी वापरकर्त्यांमधील पासवर्ड शेअरिंग थांबवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. कंपनीच्या या पावलामुळे ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

डिस्नेमधील कर्मचाऱ्यांची संख्या : 1 ऑक्टोबरपर्यंत, डिस्नेमध्ये अंदाजे 2,20,000 कर्मचारी होते. त्यापैकी अंदाजे 1,66,000 युनायटेड स्टेट्समध्ये काम करत होते. 7,000 नोकर्‍या कपात हे त्याच्या जागतिक कर्मचार्‍यांपैकी सुमारे 3 टक्के प्रतिनिधित्व करतात. बॉब इगर म्हणाले, ' हा निर्णय सहज घेण्यात आला नाही. भरपूर विचार करण्यात आला. जगभरातील आमच्या कर्मचार्‍यांची प्रतिभा आणि समर्पणाबद्दल मला खूप आदर आणि कौतुक आहे. कर्माचाऱ्यांचा कपातीमुळे कंपनीला 5.5 अब्ज वाचवायचे आहेत. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, यावेळी ग्राहकांची वाढ मंदावली आहे. पहिल्या तिमाहीत डिस्ने प्लस सबस्क्रिप्शनमध्ये घट झाली, ज्यामुळे स्ट्रीमिंग मीडिया युनिटचे एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. एक टक्का वापरकर्तेही कमी झाले. त्यामुळे कंपनी कर्माचाऱ्यांची कपात करत आहे.

झूम 15 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकणार : झूमने मंगळवारी जाहीर केले की ते सुमारे 1,300 किंवा अंदाजे 15 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहेत. अशाप्रकारे नोकर कपात करणारी झूम ही अ‍ॅमेझॉन, गुगल, स्पॉटीफाय तसेच डेल नंतर नवीनतम तंत्रज्ञान कंपनी बनणार आहे. 1,300 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ आहे. टाळेबंदीमुळे संस्थेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. आम्ही आमची टीम अंदाजे 15 टक्क्यांनी कमी करण्याचा कठोर पण आवश्यक निर्णय घेतला आहे असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : Zoom Lay Off : झूम 1,300 कर्मचार्‍यांना काढून टाकणार, सीईओ एरिक युआन यांची 98 टक्के वेतन कपात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.