ETV Bharat / business

देशात कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण; शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता

author img

By

Published : Mar 29, 2021, 7:07 PM IST

गुंतवणुकदारांचे कोरोनाच्या परिस्थितीवर जवळून लक्ष राहणार आहेत. तसेच अमेरिकेच्या बाँडच्या हालचालीबाबतही गुंतवणूकदार लक्ष ठेवून असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे संशोधक विश्लेषक सतिश कुमार यांनी सांगितले.

Stock markets may remain on tenterhooks
शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता

नवी दिल्ली - शेअर बाजार अस्थिर राहिल, असा बाजार विश्लेषकांनी अंदाज वर्तविला आहे. कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण आणि जागतिक बाजाराच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारावर परिणाम होईल, असे विश्लेषकांनी म्हटले आहे. होळीनिमित्त शेअर बाजार आज बंद राहिला आहे.

गुंतवणुकदारांचे कोरोनाच्या परिस्थितीवर जवळून लक्ष राहणार आहेत. तसेच अमेरिकेच्या बाँडच्या हालचालीबाबतही गुंतवणूकदार लक्ष ठेवून असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे संशोधक विश्लेषक सतिश कुमार यांनी सांगितले. मागी आठवड्यात शेअर बाजार निर्देशांकात 849.74 अंशाची घसरण झाली होती.

कोरोनाबाधितांची वाढत्या संख्येने शेअर बाजाराची आणखी चिंता वाढू शकते. इक्विटी रिसर्चचे प्रमुख निराली शाह म्हणाल्या की, या आठवड्यात महत्त्वाचे कार्यक्रम नाहीत. कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना बाजार पुन्हा अस्थिर राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वाहन कंपन्यांच्या शेअरवर गुंतवणुकदारांचे लक्ष केंद्रित राहणार आहे. कारण, वाहन विक्रीची आकडेवारी गुरुवारी जाहीर होणार आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर, रुपयाचे मूल्य आणि विदेशी गुंतवणूकदार संस्था यांच्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा-कोरोनाचा वाढता संसर्ग; सीरमकडून इतर देशांना लस मिळण्यास होणार उशीर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती असताना बाजार हा बदलण्याच्या प्रक्रियेत होता. बाजाराची स्थिरता ही लसीकरणासाठी लागणारा वेळ आणि चौथ्या तिमाहीमधील परिणामांवर आधारित असेल, असे जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

हेही वाचा-पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक: आदरातिथ्य क्षेत्राला आले सुगीचे दिवस!

सोमवारच्या सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये नवीन 68,020 कोरोनाचे रुग्ण भारतामध्ये आढळले आहेत. हे ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडू, कर्नाटक आणि विशेषत: महाराष्ट्र या औद्योगिकरण झालेल्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 40,414 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 108 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.