ETV Bharat / business

सर्वोच्च निर्देशांक नोंदवून शेअर बाजारात घसरण; येस बँकेचे शेअर २४ टक्क्यांनी वधारले

author img

By

Published : Oct 31, 2019, 4:52 PM IST

शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात २०० अंशाने वधारला. विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतविलेला निधी आणि जागतिक आर्थिक मंचावरील सकारात्मक स्थितीने शेअर बाजार निर्देशांक वाढला आहे.

संग्रहित - शेअर बाजार

मुंबई - मुंबई शेअर बाजाराने आजपर्यंतच्या सर्वोच्च निर्देशांकाची नोंद केली. शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ७७.१८ अंशाने घसरून ४०.१२९.०५ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ३५.४५ अंशाने घसरून ११,८७९.५५ वर पोहोचला.


शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात २०० अंशाने वधारला. विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतविलेला निधी आणि जागतिक आर्थिक मंचावरील सकारात्मक स्थितीने शेअर बाजार निर्देशांक वाढला आहे. येस बँकेला विदेशी गुंतवणूकदारांकडून ८ हजार ५०० कडून गुंतवणूकीची ऑफर मिळाली आहे. यामुळे येस बँकेचे शेअर हे २४ टक्क्यांनी वधारले आहेत.

हेही वाचा-शेअर बाजाराने मोडले सर्व विक्रम, सेन्सेक्स ऐतिहासिक उंचीवर


मागील सत्रात शेअर बाजार निर्देशांक २२०.०३ अंशाने वधारून ४०,०५१.८७ वर पोहोचला होता.

Intro:Body:

Dummy - Business News


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.