ETV Bharat / business

चांदीचे दर प्रति किलो ९३३ रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या भावातही घसरण

author img

By

Published : Dec 23, 2020, 4:52 PM IST

सोने दर न्यूज
सोने दर न्यूज

सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीही उतरल्या आहेत. चांदीचे दर प्रति किलो ९३३ रुपयांनी घसरून ६६,४९३ रुपये प्रति किलो आहेत. यापूर्वी चांदीचा दर प्रति किलो ६७,४२६ रुपये होता.

नवी दिल्ली -सोन्याच्या किमती पुन्हा उतरल्या आहेत. नवी दिल्लीत सोने प्रति तोळा २५२ रुपयांनी घसरून प्रति तोळा ४९,५०६ रुपये आहेत. मागील सत्रात सोन्याचा दर दिल्लीत प्रति तोळा ४९,७५८ रुपये होता.

सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीही उतरल्या आहेत. चांदीचे दर प्रति किलो ९३३ रुपयांनी घसरून ६६,४९३ रुपये प्रति किलो आहेत. यापूर्वी चांदीचा दर प्रति किलो ६७,४२६ रुपये होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले की, अमेरिकेत पुन्हा आर्थिक पॅकेज मिळेल अशी ग्राहकांनी आशा आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार इंग्लंडमध्ये आढळल्याने काही देशांनी सीमा बंद केल्या आहेत.

हेही वाचा-कोरोना लस चाचणीकरता भारत बायोटेककडून १३ हजार स्वयंसेवकाची भरती

जागतिक बाजाराचा सोन्यासह चांदीच्या दरावर होतो परिणाम-

दरम्यान, सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. कोरोना महामारीच्या अस्थिरतेत गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये अधिक प्रमाणात गुंतवणुकीला प्राधान्य दिले होते. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करतात. त्यानंतर सोने आणि चांदी खरेदी व विक्रीला प्राधान्य देत आहेत. दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल बदलत आहे. त्यामुळे सोने व चांदीचे दर अस्थिर आहेत.

हेही वाचा-कोरोना लसीकरण मोहिम: जाणून घ्या, को विन २० अ‌ॅपविषयी सविस्तर माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.