ETV Bharat / business

ऑक्टोबरच्या सणासुदीतही बजाज ऑटोच्या मोटारसायकल विक्रीत १४ टक्के घसरण

author img

By

Published : Nov 1, 2019, 2:52 PM IST

पुण्यामध्ये असलेल्या बजाज कंपनीने भारतीय बाजारपेठेत ऑक्टोबरमध्ये २ लाख ४२ हजार ५१६ वाहनांची विक्री केली आहे. याच कालावधीत गतवर्षी २ लाख ८१ हजार ५८२ मोटारसायकलींची विक्री केली होती. विदेशातील बाजारपेठेकडून बजाज ऑटोला किंचित दिलासा मिळाला आहे.

बजाज ऑटो

नवी दिल्ली - ऑक्टोबरमध्ये दिवाळी व दसरा असे सण असल्याने वाहन विक्री होईल, अशी वाहन उद्योगाला अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा फोल ठरल्याचे दाखवून देणारी आकडेवारी समोर आली आहे. बजाज ऑटोच्या मोटारसायकल विक्रीत ऑक्टोबरमध्ये १४ टक्के घसरण झाली आहे.

पुण्यामध्ये असलेल्या बजाज कंपनीने भारतीय बाजारपेठेत ऑक्टोबरमध्ये २ लाख ४२ हजार ५१६ वाहनांची विक्री केली आहे. याच कालावधीत गतवर्षी २ लाख ८१ हजार ५८२ मोटारसायकलींची विक्री केली होती. विदेशातील बाजारपेठेकडून बजाज ऑटोला किंचित दिलासा मिळाला आहे. चालू वर्षात ऑक्टोबरमध्ये गतवर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ३ टक्के अधिक मोटारसायकलची निर्यात झाली आहे.

हेही वाचा-वाहन उद्योगातील मंदीने भाजपच्या बहुमताला लावला 'ब्रेक'; 'ऑटो हब' म्हणून आहे महाराष्ट्रासह हरियाणाची ओळख

तर ग्राहकांची मागणी नसल्याने एकूण मोटारसायकलची विक्री ऑक्टोबरमध्ये घटली आहे. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही घसरण झाली आहे. देशातील बाजारपेठेमध्ये होणारी विक्री व निर्यात यांचे एकूण प्रमाण लक्षात घेता बजाज मोटारसायकलच्या एकूण विक्रीत १३ टक्के घसरण झाली आहे. वाहन उद्योगामधील तज्ज्ञांच्या मते, वाढत्या सवलती, कमी व्याजदर या कारणांनी उद्योगाच्या स्थितीमध्ये हळुहळू सुधारणा होत आहे.

Intro:Body:

Dummy Business News


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.