ETV Bharat / business

राज्यांच्या जीएसटी कर संकलनात वाढ होण्याची शक्यता

author img

By

Published : Feb 2, 2021, 9:40 PM IST

केंद्रीय वित्तीय सचिव अजय भूषण पांडे म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम वार्षिक २.५ लाख रुपयांहून अधिक असेल तर त्यापासून मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर लागू होणार आहे. त्यामागे विसगंती दूर करणे हा हेतू आहे.

जीएसटी कर संकलन न्यूज
जीएसटी कर संकलन न्यूज

नवी दिल्ली - येत्या काही महिन्यांत राज्यांना मिळणाऱ्या जीएसटीच्या संकलनात सुधारणा होईल, असा विश्वास केंद्रीय वित्तीय सचिव अजय भूषण पांडे यांनी व्यक्त केला. कर संकलनात वार्षिक १६.६७ टक्के वाढ होईल, हे वस्तुस्थितीला अनुसरुण असल्याचेही पांडे यांनी सांगितले.

केंद्रीय वित्तीय सचिव अजय भूषण पांडे म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम वार्षिक २.५ लाख रुपयांहून अधिक असेल तर त्यापासून मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर लागू होणार आहे. त्यामागे विसगंती दूर करणे हा हेतू आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना पीएफवर वार्षिक ८ टक्क्यांहून अधिक व्याज मिळणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न २५ लाखांहून अधिक असेल तर त्यापैकी १२ टक्के रक्कम कर्मचारी ही विनाकर जमा करू शकतात.

हेही वाचा-सलग दुसऱ्यांदा एलआयसीला ग्रुप योजनेतून मिळाला १ लाख कोटींहून अधिक विमा हप्ता

अजय भूषण पांडे म्हणाले की, व्यवस्थेमध्ये काही विसंगती आहेत. काही प्रकरणांमध्ये भविष्य निर्वाह निधीमध्ये कोट्यवधी रुपये जमा होतात. त्यांना कोणताही कर लागू न होता वार्षिक ८ टक्के व्याज मिळते. त्यामुळे समानतेचा प्रश्न उपस्थित होतो. जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील तर, तुम्ही गुंतवणूक करा. मात्र, तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये १ टक्क्यांहून अधिक कर्मचारी वार्षिक २.५ लाखांहून अधिक पीएफ जमा करत असल्याचे पांडे यांनी माहिती दिली.

हेही वाचा-रिलायन्सबरोबरील सौदा 'जैसे थे' ठेवा; फ्युचर रिटेलला उच्च न्यायालयाचे आदेश

चालू आर्थिक वर्षात सलग चौथ्या महिन्यात जानेवारीत १ लाख कोटी रुपयांहून अधिक कर संकलन झाले आहे. त्यामधून देशाची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे दिसत असल्याचे पांडे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.