ETV Bharat / business

कलम ३७० हटविल्यानंतर सफरचंद व्यापारी दहशतवाद्यांचे ठरत आहेत 'सॉफ्ट टार्गेट'

author img

By

Published : Oct 31, 2019, 7:54 PM IST

गेली तीन महिने काश्मीर खोऱ्यातील सर्व व्यवसाय बंद राहिले आहेत. यामध्ये व्यवसाय केंद्र, दुकाने, खासगी कारखाने आणि मजुरांना फटका बसला आहे. सफरचंद उत्पादक शेतकरी हे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे

सफरचंद व्यापारी

जम्मू - केंद्र सरकारने जम्मू व काश्मीरचा विशेष दर्जा असलेले ३७० आणि ३५ ए कलम हटविल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आहे. सफरचंदाचे व्यापारी हे दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. काश्मीर खोऱ्यातील जनजीवन विस्कळित झाल्याने विविध व्यवसायांचे सुमारे १० हजार कोटींचे नुकसान झाले आहे.


गेली तीन महिने काश्मीर खोऱ्यातील सर्व व्यवसाय बंद राहिले आहेत. यामध्ये व्यवसाय केंद्र, दुकाने, खासगी कारखाने आणि मजुरांना फटका बसला आहे. सफरचंद उत्पादक शेतकरी हे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने स्थानिक ट्रक चालकाशी संवाद साधला. काश्मीरमधील वाहतूक उद्योगाची आधीच घसरण सुरू आहे. ट्रक चालकांच्या मृत्यूने वाहतूक क्षेत्रावर आणखी वाईट परिणाम होईल, अशी भीती ट्रक चालकाने बोलून दाखविली. खोऱ्यामधून सफरचंदाची निर्यात थांबविण्यासाठी ट्रक चालकाविरोधात हल्ले करण्याची मोहिम सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा-जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला तडा; ९० दिवसात १० हजार कोटींचे नुकसान


दहशतवाद्यांना काश्मीरमधील स्थिती खूप विस्कळीत असल्याचे दाखवायचे आहे. त्यासाठी दहशतवादी हे ट्रक चालकांना टार्गेट करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नुकतेच जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी फळ उद्योगातील लोकांवरील हल्ला हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवरील हल्ला असल्याचे म्हटले होते.नुकतेच पुलवामामध्ये सफरचंदाचे ट्रक घेवून जाणाऱ्या चालकाची दहशतवाद्याने हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी हारपूर क्षेत्रातील मुघल रोडवरील वाहतुकीला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

Intro:Body:

blank




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.