ETV Bharat / business

फनी चक्रीवादळाने ११ हजार ९४२ कोटींचे नुकसान ; ओडिशाचा केंद्र सरकारला अहवाल

author img

By

Published : May 15, 2019, 4:40 PM IST

आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून करण्यात येणाऱ्या ६ हजार ७३६.५६ कोटींचा भार ओडिशा सरकारला सोसावा लागणार आहे. चक्रीवादळाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. घर बांधण्यासाठी सुमारे ५ हजार कोटींची तर शेतकऱ्यांना २०० कोटींची मदत ओडिशा सरकारकडून करण्यात येत आहे.

चक्रीवादळाने ओडिशामध्ये झालेले नुकसान

भुवनेश्वर - फनी चक्रीवादळाचा ओडिशाच्या किनारपट्टीला ३ मे रोजी मोठा तडाखा बसला. यामध्ये सुमारे ११ हजार ९४२ कोटींचे नुकसान झाल्याचे ओडिशा सरकारने प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
नुकसानीचा प्राथमिक अहवाल ओडिशा सरकारने केंद्र सरकारच्या पथकाचे प्रमुख अतिरिक्त गृह सचिव विवेक भारद्वाज यांना सादर केला आहे. भारद्वाज यांनी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या विविध स्थळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या होत्या. नुकसानीमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, आपत्तीग्रस्तांना करण्यात आलेली मदत आणि मदतकार्य करण्याचा खर्च यांचा समावेश करण्यात आला आहे.

आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून करण्यात येणाऱ्या ६ हजार ७३६.५६ कोटींचा भार ओडिशा सरकारला सोसावा लागणार आहे. चक्रीवादळाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. घर बांधण्यासाठी सुमारे ५ हजार कोटींची तर शेतकऱ्यांना २०० कोटींची मदत ओडिशा सरकारकडून करण्यात येत आहे. विशेष आर्थिक मदतनिधीचे आयुक्त विष्णुपाद सेठी म्हणाले, नुकसानीचा हा केवळ प्राथमिक अहवाल आहे. आम्ही प्रत्येक खेड्यात जावून नुकसानीचे सर्व्हे करणार आहोत. त्यानंतर अंतिम नुकसानीचा अहवाल महिन्याच्या शेवटी तयार करणार आहोत. आपतकालीन व्यवस्थापनाच्या निकषाचे पुनरावलोकन करण्याची केंद्रीय पथकाने सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.


मराठी अधिकाऱ्याच्या प्रयत्नाने टळले मोठे नुकसान-
फनी चक्रीवादळाने ३ मे रोजी सकाळी ओडिशाच्या किनारपट्टीवर धडक दिली. त्यावेळी वाऱ्याची गती १७५ किमी प्रति तास होती. वादळग्रस्त परिसरात मुसळधार पावसानेही हजेरी लावल्याने. मोठ्या प्रमाणात मंदिरे पाण्याखाली गेली होती. ओडिशामधील गंजाम जिल्ह्याला या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता होती. मात्र, योग्य नियोजन आणि सतर्कतेच्या बळावर मोठी जीवितहानी आणि वित्तहानी टळणे शक्य झाले आहे. यासाठी गंजामचे मराठी जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांनी अथक प्रयत्न केले होते.

Intro:Body:

biz


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.