ETV Bharat / business

आशिया खंडातील सर्वात महागड्या शहरात मुंबईचा १२ वा क्रमांक, तर कराची 'या' क्रमांकावर

author img

By

Published : Jun 28, 2019, 5:52 PM IST

जगातील सर्वात महागड्या १० शहरापैकी ८ शहरे आशिया खंडातील आहेत. राहणीमानाच्या खर्चात सर्वात महागडे शहर हाँगकाँग आहे. त्यानंतर टोकिया, सिंगापूर आणि सेऊल या शहरांचा समावेश आहे.

मुंबई

मुंबई - मूळ देश सोडून विदेशात राहणाऱ्या आशिया खंडातील नागरिकांसाठी महागड्या असणाऱ्या शहरांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये मुंबईचा 12 वा क्रमांक आहे. ही बाब ग्लोबल कन्सल्टींग कंपनी मर्सेरच्या अहवालातून समोर आली आहे. पाकिस्तानमधील कराची राहणीमानाच्या खर्चात शेवटच्या म्हणजे २०७ व्या क्रमांकावर आहे.

मर्सेसरच्या २५ व्या वार्षिक राहणीमान खर्चाचा सर्व्हे प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईची २०९ शहरात १२ वा क्रमांक आहे. यापूर्वी मुंबईचा ६७ वा क्रमांक होता. सुविधा आणि खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्या आहेत. मात्र रहिवासी घरांमध्ये सर्वात महागड्या असलेल्या शहरात मुंबईचा समावेश आहे. नवी दिल्लीचा ११८ व्या, चेन्नईचा १५४ वा, बंगळुरुचा १७९ वा आणि कोलकात्ताचा १८९ वा क्रमांक आहे.


देशातील बहुतेक शहरांमधील राहणीमानाच्या खर्चात वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर कमी झाल्याने हा परिणाम झाला आहे. ही माहिती इंडिया ग्लोबल मोबाईलिटी प्रॅक्टिस लीडरच्या पद्मा रामनाथन यांनी सांगितले. जगातील सर्वात महागड्या १० शहरापैकी ८ शहरे आशिया खंडातील आहेत. राहणीमानाच्या खर्चात सर्वात महागडे शहर हाँगकाँग आहे. त्यानंतर टोकिया, सिंगापूर आणि सेऊल या शहरांचा समावेश आहे.

राहणीमानासाठी कमी खर्च असलेल्या शहरात ट्यूनिस २०९ व्या, ताश्कंद २०८ व्या तर कराची २०७ व्या क्रमांकावर आहे. विदेशात राहणाऱ्या नागरिकांना शहरे महागडी ठरण्याची विविध कारणे आहे. उदा. एखादा भारतीय जगभरात कामानिमित्त प्रवास करत असेल तर त्याला मुंबई शहरातील महागाई भेडसावेल. यामध्ये चलनाच्या दरामधील बदल, अन्न आणि सेवांच्या महागाईचा दर आणि राहण्यासाठी असलेल्या दरातील अस्थिरता यांचा समावेश आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.