ETV Bharat / business

जीएसटी संकलनाचा आजपर्यंतचा उच्चांक; मार्चमध्ये 1.23 लाख कोटी जमा

author img

By

Published : Apr 1, 2021, 4:19 PM IST

गेली सहा महिने जीएसटीमधून मिळणाऱ्या महसुलाचे उत्पन्न वाढले आहे. कोरोना महामारीनंतरच्या काळात अर्थव्यवस्था वेगाने सुधारत असल्याचे हे चिन्ह असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

GST collections
जीएसटी संकलन

नवी दिल्ली - वस्तू व सेवा कराच्या संकलनाने (जीएसटी) मार्चमध्ये नवा उच्चांक गाठला आहे. मार्चमध्ये 1.23 लाख कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे. हे गतवर्षीच्या मार्चच्या तुलनेत 27 टक्क्यांनी अधिक आहे.

गेली सहा महिने जीएसटीमधून मिळणाऱ्या महसुलाचे उत्पन्न वाढले आहे. कोरोना महामारीनंतरच्या काळात अर्थव्यवस्था वेगाने सुधारत असल्याचे हे चिन्ह असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

बनावट बिलिंग रोखण्यासाठी जवळून देखरेख, जीएसटीशी संबंधित डाटा विविध स्त्रोतामधून जमविणे, प्राप्तिकर विभागासह सीमा शुल्कच्या यंत्रणेचा प्रभावी वापर या कारणांनी गेल्या काही महिन्यात कर महसुलात उत्पन्न वाढल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा-तुम्ही सर्कस चालवित आहात की सरकार? काँग्रेसचा केंद्रीय अर्थमंत्र्यांना टोला

असे राहिले मार्चमध्ये जीएसटी संकलन-

  • एकूण जीएसटी संकलन - 1, 23, 902 कोटी रुपये
  • केंद्रीय जीएसटी - 22, 973
  • राज्य जीएसटी - 29, 329
  • एकत्रित (इंटिग्रेटेड जीएसटी) - 62,842 कोटी ( 31, 097 कोटी रुपयाच्या आयात शुल्काचाही समावेश) आणि 8,757 कोटी उपकर (935 कोटींच्या आयात शुल्काचाही समावेश)

जीएसटी अमलात आणल्यापासून सर्वाधिक मार्च 2021मध्ये संकलन झाले आहे. गेल्या पाच महिन्यांत जीएसटीमधून मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण वाढले आहे. सलग सहा महिने जीएसटी संकलन हे 1 लाख कोटींहून अधिक असेल तर अर्थव्यवस्था सावरत असल्याचे निर्देशकआहे.

हेही वाचा-आयसीआयसीआयकडून बचत खात्यातील ठेवीवरच्या व्याजदरात 25 बेसिसने कपात

एमआरजी अँड असोसिएट्स वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणाले, की कदाचित जागतिक पातळीवर आपण महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. असे असले तरी भारतामध्ये मोठे कर संकलन होत आहे. व्यवसाय सावरत असल्याचे हे सूचक असल्याचेही रजत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.