ETV Bharat / business

केरळ व्यापाऱ्यांचा तुटतोय संयम; निर्बंध असतानाही 9 ऑगस्टला उघडणार दुकाने

author img

By

Published : Aug 2, 2021, 3:24 PM IST

व्यवसायी एकोपना समितीतचे अध्यक्ष टी. नसरुद्दीन म्हणाले, की राज्य सरकारला सर्व महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी भरपूर वेळ दिला आहे. तरीही काहीही बदल झाला नाही.

Kerala traders lose patience
Kerala traders lose patience

तिरुवनंतपुरम - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही व्यवसायावर निर्बंध राहिल्याने केरळमधील व्यापाऱ्यांचा संयम तुटत आहे. व्यवसायी एकोपना समिती या केरळमधील व्यापाऱ्यांच्या संघटनेने 9 ऑगस्टला दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले आहे.

व्यवसायी एकोपना समितीतचे अध्यक्ष टी. नसरुद्दीन म्हणाले, की राज्य सरकारला सर्व महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी भरपूर वेळ दिला आहे. तरीही काहीही बदल झाला नाही. केरळ सरकारने जाहीर केलेल्या कोव्हिड पॅकेज म्हणजे काहीच नाही. आम्ही 9 ऑगस्टला दुकाने उघडणार आहोत.

हेही वाचा-कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यातच; तर ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांक गाठणार

जुलै महिन्यात कोझीकोडे येथे विविध व्यापाऱ्यांनी आंदोलने केली आहेत. आम्हालाही जगायचे आहे, अशा त्यांनी घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पोलिसाबरोबर वाद झाला होता. आमचे कोण कर्ज कोण फेडणार आहे. (लॉकडाऊन) अनिश्चितकाळासाठी असू शकत नाही. केरळमधील व्यापारी संघटनेनेही व्यापाऱ्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शविला आहे.

हेही वाचा-मान्सून अधिवेशन : संसदेतील गदारोळाला केंद्र सरकार जबाबदार - ओवैसी

कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी व्यापाऱ्यांच्या निर्णयानंतर कोविडच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळातील कठोर नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी केरळच्या व्यापाऱ्यांना कारवाईचा इशाराही दिला आहे. व्यापाऱ्यांची राज्यस्तरीय समितीची बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करून काय रणनीती आखायची आहे, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा-सागर धनकर हत्या प्रकरण: दिल्ली पोलीस आज करणार पहिले आरोपपत्र दाखल, सुशिल कुमारसह आहेत 12 आरोपींची नावे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.