ETV Bharat / business

'कोरोनाच्या संकटानंतर जगाला चालना देण्यााकरता भारत महत्त्वाची भूमिका बजावेल'

author img

By

Published : Jul 9, 2020, 4:44 PM IST

भारतीय हे नैसर्गिकपणे सुधारक असल्याचे इतिहासाने दाखवून दिले आहे. कोणत्याही आर्थिक आणि सामाजिक आव्हानावर भारत मात करतो, हे इतिहासातून दिसून येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – भारत हे बुद्धिमत्तेचे उर्जाकेंद्र आहे. कोरोनाच्या संकटानंतर जगाला चालना देण्याकरता भारत आघाडीची भूमिका बजावेल, असा विश्वास असल्याचे पंतप्रधान नरेंद्र यांनी म्हटले आहे. ते ‘इंडिया ग्लोबल वीक 2020’ मध्ये बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की सध्याच्या काळात चालना देण्याविषयी चर्चा होणे नैसर्गिक आहे. जगाला चालना देण्याशी भारताचा संबंध असणेदेखील नैसर्गिक आहे. जगाला चालना देण्यात भारत आघाडीची भूमिका बजावेल, अशा अनेकांना विश्वास आहे. भारतीय हे नैसर्गिकपणे सुधारक असल्याचे इतिहासाने दाखवून दिले आहे. कोणत्याही आर्थिक आणि सामाजिक आव्हानावर भारत मात करतो, हे इतिहासातून दिसून येते. एकीकडे भारत जागतिक महामारीशी लढत आहे. सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष केंद्रित करताना त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष देण्यात येत आहे.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, की बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारताने जगाला योगदान दिले आहे. भारतीय तंत्रज्ञान उद्योग आणि व्यावसायिकांना कोण विसरू शकतो? ते अनेक दशकांपासून जगाला मार्ग दाखवित आहे. भारत हे बुद्धिमत्तेचे उर्जाकेंद्र आहे. या बुद्धिमत्तेचे योगदान देण्यासाठी भारत उत्सुक आहे. या कार्यक्रमात केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल, जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सी. जी. मुर्मू, इशा फाउंडेशनचे साधुगुरू जग्गी वासुदेव आणि अध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.