ETV Bharat / business

दिलासादायक! सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन १ लाख कोटी रुपयांहून अधिक

author img

By

Published : Dec 1, 2020, 4:29 PM IST

जीएसटीच्या संकलनात सुधारणा होत आहे. नोव्हेंबरमध्ये आयात वस्तुंवरील शुल्कातून मिळणारे महसुलाचे प्रमाण गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत ४.९ टक्क्यांनी जास्त असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

जीएसटी संकलन
जीएसटी संकलन

नवी दिल्ली- देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बातमी आहे. सलग दुसऱ्या महिन्यात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन हे १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. जीएसटी संकलन नोव्हेंबरमध्ये १.०४ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. ऑक्टोबरमध्ये जीएसटीचे संकलन हे १.०५ लाख कोटी रुपयांहून अधिक होते, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

जीएसटीचे नोव्हेंबर २०२० मधील संकलन हे नोव्हेंबर २०१९ च्या तुलनेत १.४ टक्के जास्त आहे. जीएसटीच्या संकलनात सुधारणा होत आहे. नोव्हेंबरमध्ये आयात वस्तुंवरील शुल्कातून मिळणारे महसुलाचे प्रमाण गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत ४.९ टक्क्यांनी जास्त असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा-बेकायदेशीर सिगरेटच्या उत्पादनातून १२९ कोटी रुपयांची करचुकवेगिरी; मुख्य सुत्रधाराला अटक

नोव्हेंबरमध्ये असे राहिले जीएसटीचे संकलन

  • एकूण जीएसटी संकलन-१,०४,९६३ कोटी रुपये
  • केंद्रीय जीएसटी - १९,१८९ कोटी रुपये
  • राज्य जीएसटी - २५,५४० कोटी रुपये
  • आयजीएसटी -५१,९९२ कोटी रुपये (आयातीचे २२,०७८ कोटी रुपये)
  • उपकर -८,२४२ कोटी रुपये (आयातीचे ८०९ कोटी रुपये)

मागील आर्थिक वर्षात १२ पैकी ८ महिन्यात जीएसटीचे संकलन हे १ लाख कोटी रुपयांहून अधिक होते. चालू आर्थिक वर्षात कोरोना आणि टाळेबंदीमुळे जीएसटी संकलनावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा-जीएसटी मोबदला: केंद्र सरकार महाराष्ट्रासह १६ राज्यांना देणार ६ हजार कोटी रुपये

चालू आर्थिक वर्षातील जीएसटी संकलन-

  • एप्रिल- ३२,१७२ कोटी रुपये
  • मे - ६२,१५१ कोटी रुपये
  • जून - ९०, ९१७ कोटी रुपये
  • जुलै -८७,४२२ कोटी रुपये
  • ऑगस्ट - ८६,४४९ कोटी रुपये
  • सप्टेंबर ९५,४८० कोटी रुपये
  • ऑक्टोबर - १,०५,१५५ कोटी रुपये
  • नोव्हेंबर - १,०४,९६३ कोटी रुपये

ऑक्टोबरमधील कर संकलन हे गतवर्षीच्या संकलनाहून १० टक्क्यांनी अधिक आहे. टाळेबंदी लागू केल्यानंतर मार्चपासून देशाच्या जीएसटी संकलनात कमालीची घसरण झाली आहे. मात्र, टाळेबंदीचे नियम शिथील केल्यानंतर त्यामध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.