ETV Bharat / business

केंद्र सरकारकडे राज्यांचा चार महिन्यांचा जीएसटी मोबदला थकित

author img

By

Published : May 17, 2020, 5:56 PM IST

निर्मला सीतारामन म्हणाल्या, की आम्ही रखडलेल्या जीएसटी मोबदल्याबाबत राज्यांशी नियमित बोलत आहोत. याबाबतची जीएसटी परिषदेत सविस्तर चर्चा झाली आहे. ठराविक राज्यांचा जीएसटी रखडलेला नाही. सर्व राज्यांच्या डिसेंबर २०२० ते मार्च २०२० पर्यंतचा जीएसटी मोबदला रखडलेला आहे.

जीएसटी मोबदला
जीएसटी मोबदला

नवी दिल्ली - देशातील सर्व राज्यांचा डिसेंबर ते मार्चदरम्यानचा जीएसटी मोबदला रखडल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्यांनी ही माहिती आत्मनिर्भर अशी संकल्पना असलेल्या आर्थिक पॅकेजचा अखरेचा टप्पा घोषित करताना माध्यमांनी दिली.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, की आम्ही रखडलेल्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) मोबदल्याबाबत राज्यांशी नियमित बोलत आहोत. याबाबतची जीएसटी परिषदेत सविस्तर चर्चा झाली आहे. ठराविक राज्यांचा जीएसटी रखडलेला नाही. सर्व राज्यांच्या डिसेंबर २०२० ते मार्च २०२० पर्यंतचा जीएसटी मोबदला रखडलेला आहे.

हेही वाचा-आत्मनिर्भर पॅकेज : कर्ज मर्यादा वाढविल्याने राज्यांना ४.२८ लाख कोटी मिळणार - केंद्रीय अर्थमंत्री

जीएसटी कायद्यानुसार महसुलाच्या भरपाईपोटी केंद्र सरकारने राज्यांना जीएसटी मोबदला द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारने महसूल संकलन कमी झाल्याने चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपासून जीएसटी मोबदला देण्यास उशीर केला आहे.

हेही वाचा-विद्यार्थ्यांकरता डिजीटल शिक्षणाची सुविधा लवकरच होणार लाँच

देशातील विविध राज्यांनी थकित जीएसटी मोबदलाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर केंद्र सरकराने डिसेंबरमध्ये ३५ हजार २९८ कोटी राज्यांना वितरित केले. तर ३४ हजार ५३ कोटी रुपये फेब्रुवारी आणि एप्रिलच्या दोन टप्प्यात राज्यांना वितरित करण्यात आले आहेत.

हेही वाचा-कोरोनाचे संकट : १३.५ कोटी नोकऱ्यांवर संक्रात; १२ कोटी जण गरिबीत ढकलले जाणार

देशात १ जूलै २०१७ पासून 'एक देश एक कर' असलेली जीएसटी करप्रणाली अस्तित्वात आली. तेव्हापासून केंद्र सरकारने राज्यांना २.४५ लाख कोटी रुपये जीएसटी मोबदला म्हणून वितरित केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.