ETV Bharat / business

जीएसटी संकलनाने ऑक्टोबरमध्ये ओलांडला १ लाख कोटींचा टप्पा

author img

By

Published : Nov 2, 2020, 2:39 PM IST

ऑक्टोबरमधील कर संकलन हे गतवर्षीच्या संकलनाहून १० टक्क्यांनी अधिक आहे. टाळेबंदी लागू केल्यानंतर मार्चपासून देशाच्या जीएसटी संकलनात कमालीची घसरण झाली आहे. मात्र, टाळेबंदीचे नियम शिथील केल्यानंतर त्यामध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र आहे.

जीएसटी
जीएसटी

नवी दिल्ली - कोरोना महामारीची झळ बसलेली अर्थव्यवस्था सावरत असल्याचे चित्र आहे. वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन ऑक्टोबरमध्ये वाढून १.०५ लाख कोटी रुपये झाले आहे. चालू वर्षात पहिल्यांदाच फेब्रुवारीनंतर जीएसटीच्या संकलनाने १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'जीएसटीआर-३ बी'च्या परताव्यांचे ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज भरण्याचे प्रमाण ८० लाख असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

असे आहे ऑक्टोबर २०२० मध्ये जीएसटी संकलन

  • सीजीएसटी - १९,१९३ कोटी रुपये
  • एसजीएसटी - ५,४११ कोटी रुपये
  • आयजीएसटी -५२,५४० कोटी रुपये
  • उपकर-८,०११ कोटी रुपये
  • एकूण जीएसटी संकलन - १,५,१५५ कोटी रुपये

ऑक्टोबरमधील कर संकलन हे गतवर्षीच्या संकलनाहून १० टक्क्यांनी अधिक आहे. टाळेबंदी लागू केल्यानंतर मार्चपासून देशाच्या जीएसटी संकलनात कमालीची घसरण झाली आहे. मात्र, टाळेबंदीचे नियम शिथील केल्यानंतर त्यामध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र आहे.

जीएसटी संकलनात वाढ-

केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव अजय भूषण पांडे म्हणाले, की काही महिन्यात कर संकलन कमी झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यात कर संकलनात सुधारणा होत आहे. एवढेच नव्हे तर त्यामध्ये वाढही होत आहे. सप्टेंबरमधील जीएसटीचे संकलन हे गतवर्षीच्या सप्टेंबरहून ४ टक्क्यांनी जास्त होते.

डेलाईटचे वरिष्ठ संचालक ए. एस. मणी म्हणाले, की आकडेवारीतून उपभोक्ततेला (कन्झम्पशन) निर्णायक चालना मिळत असल्याचे दिसत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर मागणीही वाढत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.