ETV Bharat / business

जीएसटीचे संकलन फेब्रुवारीत ७ टक्क्यांनी अधिक; ओलांडला १ लाख कोटींचा टप्पा

author img

By

Published : Mar 1, 2021, 7:32 PM IST

सलग पाचव्या महिन्यात देशातील जीएसटीचे संकलन हे १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. तर चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारीमध्ये तिसऱ्यांदा जीएसटीचे संकलन हे १.१ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेसाठी दिलासाजनक बातमी आहे. टाळेबंदी खुली झाल्यानंतर वाढणाऱ्या जीएसटीच्या (वस्तू व सेवा) करसंकलनात फेब्रुवारीमध्ये सातत्य कायम राहिले आहे. फेब्रुवारीत १ लाख १३ हजार १४३ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत ७ टक्क्यांहून अधिक आहे.

सलग पाचव्या महिन्यात देशातील जीएसटीचे संकलन हे १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. तर चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारीमध्ये तिसऱ्यांदा जीएसटीचे संकलन हे १.१ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.

हेही वाचा-घराचे स्वप्न साकारणे सुलभ; स्टेट बँकेकडून व्याजदरात कपात

असे आहे करसंकलनाचे प्रमाण

  • केंद्रीय जीएसटी- २१,०९२ कोटी
  • राज्य जीएसटी - २७,२७३ कोटी
  • एकत्रित (आयजीएसटी) जीएसटी- ५५,२५३ कोटी (२४,३८२ कोटींच्या आयात शुल्काचा समावेश)
  • उपकर- ९,५२५ कोटी (६६० कोटींच्या आयात शुल्काचा समावेश)

हेही वाचा- खूषखबर! कोरोनाविरोधातील लस खासगी रुग्णालयात मिळणार फक्त २५० रुपयांत!

फेब्रुवारीत २८ दिवसांचा महिना असतानाही जीएसटीचे संकलन वाढल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे मानण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.