ETV Bharat / business

चांगले अर्थशास्त्र की राजकीय हुशारी, अर्थसंकल्पावर अरुण जेटलींनी 'ही' दिली प्रतिक्रिया

author img

By

Published : Jul 6, 2019, 4:51 PM IST

मध्यमवर्गीय, नव मध्यमवर्गीयांच्या इच्छेप्रमाणे परवडणाऱ्या दरातील घरे, इलेक्ट्रिक वाहने यासारख्या गोष्टींना अर्थसंकल्पात  सवलत देण्यात आल्याचे जेटलींनी म्हटले आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

नवी दिल्ली - विविध अर्थतज्ज्ञांकडून आणि क्षेत्रातून शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. अशातच माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील अर्थसंकल्पावर फेसबुक पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाला उच्च प्रगतीकडे नेण्यासाठी रोडमॅप देणारा अर्थसंकल्प दिल्याचे जेटलींनी म्हटले आहे.

चांगले अर्थशास्त्र की राजकीय हुशारी, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र दोन्हींमध्ये निवड करणे चुकीचे आहे. कारण सरकारला टिकण्यासाठी आणि कामगिरी करण्यासाठी दोन्हींची आवश्यकता असते, असे जेटलींनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अर्थसंकल्पातून महत्त्वाकांक्षी भारतासाठी राजकीय दिशा निर्माण झाली आहे. मध्यमवर्गीय, नव मध्यमवर्गीयांच्या इच्छेप्रमाणे परवडणाऱ्या दरातील घरे, इलेक्ट्रिक वाहने यासारख्या गोष्टींना अर्थसंकल्पात सवलत देण्यात आल्याचे जेटलींनी म्हटले आहे.


अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे पायाभूत क्षेत्र, बांधकाम आणि स्थावर मालमत्तेमुळे नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. तसेच गुंतवणूक आकर्षित होणार आहे. जगात सर्वाधिक विकसित होणारी भारताची अर्थव्यस्था यापुढेही कायम राहील, असा विश्वास जेटलींनी व्यक्त केला आहे. जेटली हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मोदी २.० सरकारमध्ये सहभागी झाले नाहीत.

असे आहे आर्थिक चित्र -
गेल्या पाच वर्षात जानेवारी-मार्चमधील जीडीपी हा सर्वात कमी म्हणजे ५.८ टक्के नोंदविण्यात आला आहे. तर आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये विकासदर हा पाच वर्षात सर्वात कमी ६.८ टक्के राहिला आहे. वित्त मंत्रालयाच्या आर्थिक सर्व्हेनुसार चालू आर्थिक वर्षात विकासदर हा ७ टक्के होणार आहे.

येत्या पाच वर्षात अर्थव्यवस्था ५ लाख कोटींची होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केला होता

Intro:Body:

Biz


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.