ETV Bharat / business

इन्फोसिसकडून अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून हजारो कर्मचाऱ्यांना नारळ?

author img

By

Published : Nov 6, 2019, 3:44 PM IST

इन्फोसिसकडून इन्व्होल्यून्टरी अ‌ॅट्रिशन म्हणजे अपेक्षेएवढी अथवा उच्च दर्जाची कामगिरी नसलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून काढण्यात येते

संग्रहित - इन्फोसिस

बंगळुरू - माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसने विविध पातळीवरील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. अपेक्षेएवढी अथवा उच्च दर्जाची कामगिरी नसलेल्या कर्मचाऱ्यांनाच सेवेतून काढण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.


इन्फोसिस ही उच्च कामगिरी करणारी संस्था आहे. हजारो कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याचे वृत्त ही चुकीच्या आकेडवारीवर असेलली अफवा असल्याचे इन्फोसिसमधील सूत्राने म्हटले आहे. कंपनीने कधीही आकडेवारी दिलेली नसल्याचेही सूत्राने सांगितले.

हेही वाचा-बीएसएनएलची स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर; जाणून घ्या, किती मिळणार कर्मचाऱ्यांना पैसे

काय आहे ही कारवाई-

इन्फोसिसकडून इन्व्होल्यून्टरी अ‌ॅट्रिशन म्हणजे अपेक्षेएवढी अथवा उच्च दर्जाची कामगिरी नसलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून काढण्यात येते. याबाबत माहिती देताना सूत्राने सांगितले की, ते कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे नाही. जर तुम्ही दोन वर्ष अथवा दोन तिमाहीत चांगली कामगिरी करत नसाल तर तुम्हाला जाण्याविषयी विचारले जाते. हे कामगिरीशी निगडीत असलेली गोष्ट आहे. इन्फोसिसची प्रतिस्पर्धी कंपनी असेली विप्रोदेखील राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या व चांगल्या कामगिरीअभावी काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जाहीर करत असते.

हेही वाचा-केंद्र सरकार कांद्यांचे भाव नियंत्रणात आणण्याकरिता 'हे' उचलणार मोठे पाऊल

कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची नोटीस दिलेली नाही. ही अंतर्गत माहिती आम्ही देत नाही. हे निरर्थक असल्याचे सांगून तुम्ही उद्या ऑफिस सोडा, असे कर्मचाऱ्यांना कंपनी कधीही सांगत नाही, असेही सूत्राने म्हटले आहे. कार्यक्षम नसलेल्या कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ दिला जात असल्याचे सूत्राने सांगितले.

मागील तिमाहीत कंपनीमध्ये इन्फोसिमध्ये २ लाख ३६ हजार ४८६ कर्मचारी सेवेत राहिले आहेत. तर गतवर्षी दुसऱ्या तिमाहीत २ लाख १७ हजार ७३९ कर्मचारी सेवेत होते.

यापूर्वी कॉग्नीझंट या आयटी कंपनीने सुमारे ७ हजार कर्मचाऱ्यांना सेवेतून काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. असे असले तरी त्याचा भारतामधील कर्मचाऱ्यांवर फारसा प्रभाव पडणार नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

Intro:Body:

Dummy Business News


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.