ETV Bharat / business

उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीत जगात सर्वाधिक वाढ; एलॉन मस्कलाही टाकले मागे

author img

By

Published : Mar 12, 2021, 6:51 PM IST

ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सकडून जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीच्या आकडेवारीची दैनंदिन माहिती घेतली जाते. या माहितीप्रमाणे अदानी यांच्या एकूण संपत्तीत १ जानेवारी २०२१ पासून १६.२ अब्ज डॉलरची (सुमारे १.२ लाख कोटी) वाढ झाली आहे.

Gautam Adani
गौतम अदानी

बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत- अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी हे चालू वर्षात संपत्तीत वाढ होण्यामध्ये पहिल्या क्रमांकाचे उद्योगपती ठरले आहेत. गुंतवणुकदारांनी कंपन्यांमध्ये अधिक गुंतवणूक केल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सकडून जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीच्या आकडेवारीची दैनंदिन माहिती घेतली जाते. या माहितीप्रमाणे अदानी यांच्या एकूण संपत्तीत १ जानेवारी २०२१ पासून १६.२ अब्ज डॉलरची (सुमारे १.२ लाख कोटी) वाढ झाली आहे.

  • १२ मार्चच्या आकडेवारीनुसार अदानी यांच्या संपत्तीत गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रीन यांच्याहून अधिक भर पडली आहे. लॅरी पेज यांच्या संपत्तीत १ जानेवारीपासून १४.३ अब्ज डॉलर तर सर्जी ब्रीन यांच्या संपत्तीत १४.३ अब्ज डॉलरची भर पडली आहे.
  • याच कालावधीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ७.५९ अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. तर जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांच्या संपत्तीत १०.३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

हेही वाचा-चांदीच्या दरात प्रति किलो १,०९६ रुपयांची घसरण

  • आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत असलेले, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत केवळ ८.०५ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ अदानी यांच्या संपत्तीच्या वाढीच्या जवळपास निम्मी आहे.
  • मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ८४.८ अब्ज डॉलर आहे. ते जगातील दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

हेही वाचा-अ‌‌ॅमेझॉनकडून डिजीटल देयक व्यवहारात २२५ कोटींची गुंतवणूक

  • अदानी यांचा दळणवळणामध्ये (लॉजिस्टिक्स) देशात सर्वात मोठा उद्योग आहे. त्यांच्याकडे देशातील महत्त्वाचे बंदरे आणि विमानतळे आहेत. तसेच नवीन अभिकरणीय उर्जा उत्पादनातही अदानी ग्रुप आघाडीवर आहे.
  • अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लि. ही अदानी ग्रुपच्या मालकीची आहे.
  • नुकतेच अदानी ग्रुपने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये ७४ टक्के हिस्सा घेतला आहे. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाबरोबर (एएआय) लखनौ, अहमदाबाद, जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू विमानतळाबरोबर सवलतींसाठी करार केला आहे.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या किमती तेराव्या दिवशीही स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.