ETV Bharat / business

गडगडलेला शेअर बाजार काहीसा वधारला; 'कोरोना'चा प्रभाव मात्र कायम..

author img

By

Published : Mar 11, 2020, 6:08 PM IST

शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ३८६.५६ अंशांनी, तर निफ्टी ९३.६५ अशांनी वधारले होते. काही प्रमाणात वाढ दिसत असली, तरी येस बँकेच्या शेअर्समधील वाढ आणि रिलायन्समधील घसणीमुळे हा संमिश्र परिणाम दिसून आला. यादरम्यान बाजारावर कोरोनाचा प्रभाव कायम असल्याचे दिसून येत आहे.

Sensex gets minor gain as yes bank rises and relince loses some points
गडगडलेला शेअर बाजार काहीसा वधारला; 'कोरोना'चा प्रभाव मात्र कायम

मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. ती आज थांबली. गडगडलेला शेअर बाजार बुधवारी अगदी किंचित वधारला आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६२.४५ अंशांनी वधारून ३५,६९७.४० अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६.९५ अंशांनी वधारून १०,४५८.४० अंशांवर बंद झाला.

शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ३८६.५६ अंशांनी, तर निफ्टी ९३.६५ अशांनी वधारले होते. काही प्रमाणात वाढ दिसत असली, तरी येस बँकेच्या शेअर्समधील वाढ आणि रिलायन्समधील घसणीमुळे हा संमिश्र परिणाम दिसून आला. यादरम्यान बाजारावर कोरोनाचा प्रभाव कायम असल्याचे दिसून येत आहे.

येस बँकेचे शेअर्स वधारले..

शनिवारपर्यंत बँकेवरील बंदी काढण्यात येईल, अशी आशा येस बँकेचे प्रशासक प्रशांत कुमार यांनी सोमवारी व्यक्त केली होती. त्यानंतर, आज बँकेचे शेअर्स ३५.५३ टक्क्यांनी वधारले. यासोबतच खासगी बँकांपैकी आयसीआयसीआय (१.८० टक्के), एचडीएफसी (१.११ टक्के) आणि आरबीएल (९.०७ टक्के) या बँकांच्या शेअर्सच्या किंमतीतही वाढ झाली.

आखाती देशांमधील तेलयुद्ध अन् टेलिकॉम प्रकरणाचा रिलायन्सला फटका..

आखाती देशांमध्ये सुरू असलेले तेलयुद्ध, आणि सर्वोच्च न्यायालयाने टेलिकॉम कंपन्यांना दिलेले निर्देश यामुळे रिलायन्स कंपनीला फटका बसला आहे. आज शेअर बाजार बंद होताना रिलायन्सचा शेअर ३.५४ टक्क्यांनी घसरला होता.

हेही वाचा : शेअर बाजारातील घसरणीचे 'हे' आहे कारण, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.