ETV Bharat / business

वैज्ञानिक संशोधनातून सार्वजनिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी बांधील - भारत बायोटेक

author img

By

Published : Nov 28, 2020, 7:05 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायोटेकमधील लसनिर्मितीच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली आहे. त्याबाबत प्रतिक्रिया भारत बायोटेकने म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने आमच्या टीमला खूप प्रेरणा मिळाली आहे.

भारत बायोटेक
भारत बायोटेक

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीला भेट दिली आहे. ही कंपनी हैदराबादमधील जिनोम व्हॅलीमध्ये कोरोनावरील लसनिर्मिती करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायोटेकमधील लसनिर्मितीच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली आहे. त्याबाबत प्रतिक्रिया भारत बायोटेकने म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने आमच्या टीमला खूप प्रेरणा मिळाली आहे. वैज्ञानिक संशोधनातून सार्वजनिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही बांधील आहोत. कोरोनाच्या लढ्यात सहभागी आहोत.

हेही वाचा-मोदींचा व्हॅक्सीन दौरा...! सीरम, झायडस आणि भारत बायोटेक कंपनीला मोदींची भेट

भारत सरकार, नियामक, कोरोना लसीचे भागीदार, वैद्यकीय संशोधक आदींचे आभारी आहोत. याचबरोबर रुग्णालयाकडून आणि कोरोना लसीसाठी मिळणाऱ्या सहकार्याबद्दल भारत बायोटेकचे आभार मानले आहेत.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. या टप्प्यात २६ जणांवर चाचणी करण्यात येणार आहेत. कोव्हॅक्सिनची निर्मिती ही बायोसेफ्टी लेव्हल ३ उत्पादन केंद्रात होणार आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर संयुक्तपणे कोव्हॅक्सिनवर संशोधन करत आहेत. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही)मधून घेतलेल्या सार्स-कोव्ह-२ विषाणूवर अभ्यास करुन या लसीची निर्मिती करण्यात येत आहे.

हेही वाचा-अहमदाबाद-हैदराबाद-पुणे, असा असेल पंतप्रधान मोदींचा कोरोना व्हॅक्सिन दौरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.