ETV Bharat / business

भारताचे उर्जा क्षेत्रात १०० अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट निश्चित - पंतप्रधान मोदी

author img

By

Published : Oct 29, 2019, 11:28 PM IST

Updated : Oct 29, 2019, 11:33 PM IST

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतामधील कररचना आणि बौद्धिक संपदा हक्क हे जगातील सर्वोत्तम आहे. स्टार्टअपच्या वाढत्या प्रमाणाचा फायदा उद्योगांनी घ्यावा, असे पंतप्रधानांनी आवाहन केले.

संग्रहित - नरेंद्र मोदी

रियाध - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियामधील उर्जा कंपन्यांना गुंतवणुकीकरता निमंत्रण दिले आहे. भारताने उर्जा क्षेत्रात १०० अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ते 'फ्युचर इन्व्हेसमेंट इनिशिव्ह २०१९' कार्यक्रमात बोलत होते.

भारतामध्ये गुंतवणुकीकरता प्रचंड संधी आहे. येत्या ५ वर्षात देशाने ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सरकार केवळ पायाभूत क्षेत्रातच पाच वर्षात १.५ लाख कोटी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगांसाठी देशामधील वातावरण सुधारण्याकरिता सरकारने घेतलेल्या विविध उपक्रमांची मोदींनी यावेळी माहिती दिली. जागतिक बँकेच्या उद्योगानुकलतेच्या क्रमवारीत भारताचे स्थान सुधारल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-आरबीआयचा राज्यातील 'या' दोन सहकारी बँकांना दणका; सव्वा कोटींचा दंड

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतामधील कररचना आणि बौद्धिक संपदा हक्क हे जगातील सर्वोत्तम आहे. स्टार्टअपच्या वाढत्या प्रमाणाचा फायदा उद्योगांनी घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. भारत ही स्टार्टअपची जगातील तिसऱ्या क्रमांकाची इकोसिस्टिम आहे. यामधून गुंतवणूकदारांना सर्वात अधिक परतावा मिळतो. भारत सरकार कौशल्य विकास आणि पुन्रकौशल्यावर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या तीन ते चार वर्षात कोट्यवधी लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे सरकारची २० अब्ज डॉलरची बचत झाल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

Dummy Business News


Conclusion:
Last Updated : Oct 29, 2019, 11:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.