ETV Bharat / business

पर्यटन क्षेत्रासाठी सरकारने तत्काळ मदत करावी; आयएटीओची मागणी

author img

By

Published : Sep 7, 2020, 5:37 PM IST

सरकारने विविध पातळीवर मदत करावी, असे आयएटीओने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाएवढी एकवेळ आर्थिक मदत करावी, अशी आयएटीओने मागणी केली आहे. अनेक टूर ऑपरेटर्सनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तर काही जणांना ३० टक्के वेतन मिळत आहे.

पर्यटन क्षेत्र
पर्यटन क्षेत्र

नवी दिल्ली - पर्यटन क्षेत्रासाठी सरकारने तत्काळ मदत करावी, अशी इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयएटीओ) या संघटनेने केली आहे. कोरोना महामारीचा पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे संघटनेने म्हटले आहे.

सरकारने विविध पातळीवर मदत करावी, असे आयएटीओने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाएवढी एकवेळ आर्थिक मदत करावी, अशी आयएटीओने मागणी केली आहे. अनेक टूर ऑपरेटर्सनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तर काही जणांना ३० टक्के वेतन मिळत आहे.

केंद्र सरकारकडून सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्ज दिले जात आहेत. त्यामध्ये बदल करत पर्यटन उद्योगालाही कर्ज मिळावे, अशी संघटनेने मागणी केले आहे.

हेही वाचा-डिझेलचा दर प्रति लिटर १२ पैशांनी कमी; पेट्रोलचे दर स्थिर

पर्यटन उद्योग अडचणीत असल्याने सरकारकडून तातडीच्या मदतीची गरज आहे. सरकारकडून मोठ्या मदत गरज नाही. मात्र, सरकारकडून उद्योगाला दिलासा देणे शक्य आहे. त्याचा पर्यटन उद्योगाला दीर्घकाळ फायदा होणार आहे. अनेक टूर ऑपरेटर हे संकटामुळे त्यांचे व्यवसाय बंद करत असल्याचे आयएटीओचे अध्यक्ष प्रणब सरकार यांनी सांगितले.

हेही वाचा-'भारताच्या जीडीपीतील घसरण ही प्रत्येकासाठी धोक्याची घंटा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.