ETV Bharat / business

गुगलकडून मॅपमध्ये वापरकर्त्यांना करता येणार बदल

author img

By

Published : Mar 13, 2021, 5:08 PM IST

Google Map
गुगल मॅप

जेव्हा तुम्हाला गुगल मॅपमध्ये एखाद्या रस्त्याचा समावेश नसल्याचे दिसते, तेव्हा मेन्यू बटनावर क्लिक करा. इडिट द अॅपला निवडा. त्यामध्ये मिसिंग रोडला निवडा. मॅपची ताकद तुमच्या हातात आहे, असे गुगल मॅपचे संचालक केव्हिन रीस यांनी सांगितले.

नवी दिल्ली - अनेकदा गुगल मॅपने दाखविलेल्या चुकीच्या दिशांमुळे वापरकर्त्यांचा गोंधळ उडतो. त्यावर गुगलने चांगली शक्कल लढविली आहे. गुगलने ८० हून अधिक देशांमध्ये मॅपचे संपादन (इडिट) करण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना काही विसरलेले रस्ते, ठिकाणे यांच्या नावातील बदल अथवा चुकीची माहिती काढणे शक्य होणार आहे.

जेव्हा तुम्हाला गुगल मॅपमध्ये एखाद्या रस्त्याचा समावेश नसल्याचे दिसते, तेव्हा मेन्यू बटनावर क्लिक करा. इडिट द अॅपला निवडा. त्यामध्ये मिसिंग रोडला निवडा. मॅपची ताकद तुमच्या हातात आहे, असे गुगल मॅपचे संचालक केव्हिन रीस यांनी सांगितले. केव्हिन रीस पुढे म्हणाले की, केवळ रेषा ओढून नवे रस्ते जोडता येतात. नवीन रस्त्यांची नावे बदलण्यात येतात. रस्त्यांची दिशा बदलता येते. चुकीची माहिती काढता येते. कोणत्या दिवशी व कोणत्या दिशेने रस्ता बंद झाला आहे, याची माहितीही तुम्हाला देणे शक्य होणार आहे. ही माहिती अचूकपणे अद्ययावत होण्यासाठी आम्ही पडताळणी करणार आहोत, असी रिसी यांनी सांगितले.

Google map user
गुगल मॅप वापरकर्ता

हेही वाचा-१ एप्रिल २०२२ नंतर १५ वर्षे जुनी सरकारी वाहने भंगारात निघणार

  • हे फीचर येत्या काही महिन्यांत ८० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्था
  • निक उद्योगांना रिव्ह्यूव, फोटो आणि इतर अपडेट देण्यासाठी स्थानिक उद्योग सहभागी होऊ शकतात.
    google map photo
    गुगल मॅप फोटो
  • गुगलकडून मॅपमध्ये फोटो अपडेट दिले जाणार आहे. फोटो अपडेटमुळे वापरकर्त्यांना अद्ययावत माहिती मिळणे शक्य होणार आहे. त्यामधून त्यांना निर्णय घेता येणार आहेत.
    गुगल मॅप
  • गुगलमध्ये ८७ देशांमधील रस्त्यांची माहिती आहे. त्यामध्ये १०० दशलक्ष उद्योगांच्या माहितीचा समावेश आहे. गुगल मॅपमध्ये १० हजारांहून अधिक सरकारी संस्था आणि इतर एजन्सींचे नकाशे व माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा-प्रत्येकाला लस मिळेल, अशी आशा- रतन टाटा

दरम्या, गुगलकडून विविध सेवा आणि अ‌ॅप सतत अपडेट केले जातात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.