ETV Bharat / business

'देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची होण्याची कोणतीही आशा नाही'

author img

By

Published : Oct 17, 2019, 6:01 PM IST

Updated : Oct 17, 2019, 7:05 PM IST

गाजावाजा करत सुटलेले भाजपचे 'डबल इंजिन' हे निव्वळ अपयशी ठरले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या खूप वाईट स्थितीमध्ये असल्याचे मनमोहन सिंग म्हणाले.

मनमोहन सिंग

मुंबई - वर्षामागून वर्ष देशाचा जीडीपी (राष्ट्रीय सकल उत्पन्न) घसरत आहे. अशा स्थितीत देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची होण्याची कोणतीही आशा नसल्याचे मत माजी पंतप्रधान तथा अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले.

मनमोहन सिंग म्हणाले, चालू आर्थिक वर्षात देशाचा अंदाजित जीडीपी हा ७.३ टक्क्यांवरून ६.१ टक्के होईल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. एका वर्षामागून वर्ष विकासदर घसरत असताना देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची होईल, अशी कोणतीही आशा वाटत नाही.

हेही वाचा-जीओचा एअरटेल, व्होडाफोन आयडियावर फसवणुकीचा आरोप; जाणून घ्या, काय आहे नेमके प्रकरण

गाजावाजा करत सुटलेले भाजपचे 'डबल इंजिन' हे निव्वळ अपयशी ठरले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या खूप वाईट स्थितीमध्ये आहे. महाराष्ट्रातील उत्पादन वाढीचा दर हा गेली चार वर्षे घसरत चालला आहे, असे मत सिंग यांनी म्हटले. देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची होण्यासाठी सरकारने राष्ट्रीय रणनीतीवर विचार करून त्याचा अवलंब केला पाहिजे, असे मत सिंग यांनी गेल्या महिन्यात व्यक्त केले होते.

अर्थव्यवस्थेवर बोलताना मनमोहन सिंग

हेही वाचा- आमची मालमत्ता विकून बँकेचे कर्ज फेडा ; पीएमसी घोटाळ्यातील वाधवान पिता-पुत्राचे आरबीआयला पत्र

दरम्यान, मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

Intro:Body:

Former prime minister Manmohan Singh said that he does not think there is "any hope" of the Indian economy reaching the target of five trillion dollars by 2024.

Mumbai: Former prime minister Manmohan Singh on Thursday said that he does not think there is "any hope" of the Indian economy reaching the target of five trillion dollars by 2024 as the growth rate is "declining year after year".




Conclusion:
Last Updated : Oct 17, 2019, 7:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.