ETV Bharat / briefs

विश्वकरंडकापूर्वी पाकिस्तानला धक्का, मार्क वुडच्या एका चेंडूने केले 'या' खेळाडूला जायबंदी

author img

By

Published : May 18, 2019, 9:16 AM IST

Updated : May 18, 2019, 9:50 AM IST

इमामची दुखापत गंभीर असेल तर तो पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. कारण सध्या तो तुफान फॉर्मात आहे. तिसऱ्या सामन्यात त्याने १३१ चेंडूत १५१ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती.

इमाम उल- हक

डुब्लिन - विश्वकरंडक तोंडावर आलेला असतानाच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. सलामीचा फलंदाज इमाम उल हक जखमी झाला आहे. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात मार्क वुडचा चेंडू त्याच्या कोपऱ्यावर लागला. त्यामुळे तो रिटायर्ड होऊन मैदानाबाहेर गेला.


या घटनेनंतर इमाम यास हाताचा एक्स-रे- काढण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकले नाही. मार्क वुडचा ८९ किमी प्रतिवेगाने येणारा चेंडू इमामच्या कोपऱ्यावर लागल्याने तो वेदनेने कळवळू लागला. यावेळी तो ३ धावांवर फलंदाजी करत होता.


इमामची दुखापत गंभीर असेल तर तो पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. कारण सध्या तो तुफान फॉर्मात आहे. तिसऱ्या सामन्यात त्याने १३१ चेंडूत १५१ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १ षटकार खेचला. दीडशे पेक्षा जास्त धावा काढणार तो सर्वात युवा खेळाडू बनला आहे. या खेळीसह इमामने १९८३ साली कपिल देव यांनी केलेला ३६ वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 18, 2019, 9:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.