ETV Bharat / briefs

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज, ९७४ कर्मचारी लोहमार्गावर घालताहेत २४ तास गस्त

author img

By

Published : Jun 7, 2020, 2:28 PM IST

मान्सूनसाठी कोकणरेल्वे सज्ज : ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर २४ तास गस्त; १० जून पासून मान्सून वेळापत्रक

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज
मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज

रत्नागिरी - लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि श्रमिकांच्या घरवापसीसाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या कोकण रेल्वेने याच कालावधीत आपली मान्सूनपूर्व सुरक्षा उपाययोजनांची कामेही पूर्ण केली आहेत. १० जूनपासून कोकणरेल्वेच्या मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू होत असून सुरक्षेचे उपाय म्हणून संपूर्ण मार्गावर ९७४ कर्मचारी २४ तास पेट्रोलिंगसाठी तैनात केले जात आहेत. पावसाळ्याच्या काळात संपूर्ण रेल्वे वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी सुरक्षा उपाययोजनांची सगळी कामे कोकण रेल्वेकडून पूर्ण करण्यात आली आहे .

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज
मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४० किलोमीटरच्या पट्ट्यात मान्सूनपूर्व कामांना काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. यात प्रामुख्याने पावसात कोकण रेल्वेच्या मार्गावर पाणी येऊ नये, यासाठी पाण्याचे मार्ग मोकळे करणे आणि मार्गानजिकच्या कटिंगची पहाणी करून धोकादायक वाटणारी कटिंग काढून टाकणे, याला प्राधान्य देण्यात आले. गेल्या काही वर्षात केलेल्या सततच्या उपाययोजनांनी आणि घेतलेल्या खबरदारीमुळे गेल्या सात वर्षात मार्गावर दरड व माती येण्याचे प्रकार खूप कमी झाले आहेत.

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज
मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज

मान्सूनच्या काळात आता संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून २४ तास गस्त घातली जाणार आहे. धोकादायक कटिंग आहेत, तेथे विशेष उपाययोजना केल्या गेल्या असून या ठिकाणी २४ तास कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहे. अशा ठिकाणांवर रेल्वेचा वेगही नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत मिळावी, यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशीन्ससारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहेत .

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज
मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज

मुसळधार पाऊस पडत असताना रेल्वेचा वेग ताशी ४० किलोमीटर असावा, अशा सूचना लोकोपायलटला देण्यात आल्या आहेत. तर, आपात्कालीन स्थितीत मदतीकरिता अ‌ॅक्सिडेन्ट रिलीफ मेडिकल व्हॅन रत्नागिरी आणि वेरना गोवा इथे तैनात ठेवण्यात आल्या आहेत . लोकोपायलट आणि गार्डना वॉकी टॉकी यंत्रणा पुरवण्यात आल्या आहेत. मार्गावर पूर्वीपासून एक-एक किलोमीटर अंतरापर्यंत कार्यरत असलेली संपर्क यंत्रणा मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तपासून सज्ज करण्यात आली आहे. सॅटेलाईट फोन सारखी अत्याधुनिक यंत्रणाही रिलीफ व्हॅनमध्ये सुसज्ज ठेवण्यात आली आहे .

मुसळधार पावसाच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याची खबर देणारी यंत्रणा मार्गावर तीन पुलांवर ठिकाणी सुसज्ज आहे. पुराचे पाणी धोकादायक पातळीच्या वर आल्यासही यंत्रणा 'अलर्ट' देते . याचबरोबर माणगाव , चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उद्दपी येथे पर्जन्य मापक यंत्रणा मार्गावरील ९ स्थानकात सुसज्ज असून अतिवृष्टी काळातही यंत्रणा सूचना करेल.

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज
मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज

मान्सूनच्या काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहून रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर लक्ष ठेवून राहील. कोकण रेल्वेच्या मार्गावर मान्सून वेळापत्रक १० जून २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीसाठी कार्यान्वित राहील, अशी माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आली आहे. पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे.

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज
मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.