ETV Bharat / briefs

कोलकात्याच्या संघानंतर या संघाने पूर्ण केले षटकारांचे शतक

author img

By

Published : May 4, 2019, 6:09 PM IST

कोलकातानंतर मुंबई शंभर षटकार ठोकणार दुसरा संघ बनला आहे. कोलकाताने १२ सामन्यात १२४ षटकार मारले आहेत.

केकेआर-मुंबई

मुंबई - आयपीएल २०१९ मध्ये केकेआरचा संघ प्लेऑफमध्ये जागा मिळविण्यासाठी संघर्ष करताना दिसून येते. तर दुसरीकडे मुंबईच्या संघाने हैदरबादवर रोमहर्षक विजय मिळवत प्लेऑफमध्ये स्थान मिळविले. याचसोबत मुंबईने आयपीएल २०१९ मध्ये नवा विक्रम केला आहे.


कोलकातानंतर मुंबई शंभर षटकार ठोकणार दुसरा संघ बनला आहे. कोलकाताने १२ सामन्यात १२४ षटकार मारले आहेत. यातील सर्वाधिक ५० षटकार आंद्रे रसेलने मारले आहेत. नुकतेच मुंबईने षटकारांचे शतक पूर्ण केले आहेत. मुंबईकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक २९ षटकार मारले आहेत.


आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाने ६४, राजस्थान ६३ तर चेन्नईच्या संघाने ६० षटकार खेचले आहेत. विशेष म्हणजे चेन्नई कमी षटकार मारुनही गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. चेन्नईकडून धोनीने २०, हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर २१, दिल्लीचा ऋषभ पंत १६ तर राजस्थानच्या जोस बटलरने १४ षटकार मारले आहेत. गुणतालिकेत कोलकाता मागे असला तर तरी सर्वाधिक षटकार मारण्यात हा संघ आघाडीवर आहे.

Intro:Body:

Sports 04


Conclusion:

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.