ETV Bharat / breaking-news

धनगर समाजाचा मोर्चा अडवला; पडवळकर, जानकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

author img

By

Published : Feb 28, 2019, 8:43 AM IST

Breaking News

2019-02-28 07:05:33

धनगर समाजाचा मोर्चा पनवेलमध्ये अडवला

पनवेल - धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाजाच्यावतीने शेळ्या-मेंढ्यासह विधानभवनावर मोर्चा काढण्यात येत आहे. महाड येथून सुरू झालेला हा मोर्चा पनवेलच्या कळंबोलीत दाखल होताच समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे धनगर समाजात सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे.

आदिवासी वर्गात आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाचा महाडहून निघालेल्या मोर्चा बुधवारी कळंबोलीमध्ये दाखल झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची अडवणूक केली. तसेच धनगर समाजाचे समन्वयक पडळकर आणि जानकर यांच्यासह अनेक समन्वयकांना ताब्यात घेतले. 

पोलिसांनी पनवेल, कामोठे आणि कळंबोली परिसरातून आलेल्या समन्वयकांना विधान भवनावर मोर्चा काढण्यापासून रोखले आहे. यावेळी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत आंदोलकांनी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, विधानसभेच्या पायऱ्यांवर जाण्यापासून आंदोलकांना सरकार जाणून बुजून अडवत असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. सरकारची ही पोलीस कारवाई म्हणजे धनगर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका पडवळकर यांनी केली आहे.
 

Intro:पनवेल

धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी शेळ्या मेंढऱ्यासह निघालेला महाड ते विधानभवन मोर्चा पनवेलच्या कळंबोलीत दाखल होताच पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांच्यासह आणखी कार्यकर्त्यांना अटक केल्याने धनगर समाजात सरकार विरोधात रोष सुरू झाला आहे.



Body:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या हिंसक आंदोलनाची झळ महाराष्ट्र नसली आता आदिवासी वर्गात आरक्षण मिळावं म्हणून धनगर समाज देखील आक्रमक झाले महाडहून निघालेल्या धनगर समाजाचा मोर्चा आज कळंबोली मध्ये दाखल होताच पोलिसांनी आंदोलकांची अडवणूक केली. आज सायंकाळी साडेचार वाजता हा मोर्चा कळंबोलीत दाखल झाला असतानाच धनगर समाजाचे समन्वयक गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांच्यासह अनेक समन्वयकांना कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं. पनवेल कामोठे कळंबोली या परिसरातून आलेल्या समन्वयकाना विधान भवनावर मोर्चा काढण्यापासून रोखल आहे.


Conclusion:सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करतधनगर समाजाच्या आंदोलकांनी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान विधानसभेच्या पायऱ्यावर जाण्यापासून आंदोलकांना सरकार जाणून बुजून अडवत असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. सरकारची ही पोलीस कारवाई म्हणजे धनगर आंदोलन दडपण्याचा हुकूमशाही असल्याची टीका यावेळी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडवळकर यांनी दिली.
--------
बातमीसाठी फोटो एटीपी करीत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.