ETV Bharat / bharat

Man Killed in Golden Temple : सुवर्ण मंदिरात चुकीचे कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची हत्या

author img

By

Published : Dec 18, 2021, 8:16 PM IST

Updated : Dec 18, 2021, 10:47 PM IST

पंजाबमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. सुवर्ण मंदिरात ( golden temple Amritsar ) चुकीचे कृत्य ( desecrate Golden Temple ) करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे. या तरुणाची हत्या करण्यात ( man dead in Golden temple ) आली आहे.

सुवर्ण मंदिरात चुकीचे कृत्य
सुवर्ण मंदिरात चुकीचे कृत्य

अमृतसर - पंजाबमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. सुवर्ण मंदिरात ( golden temple Amritsar ) चुकीचे कृत्य ( desecrate Golden Temple ) करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे. या तरुणाची हत्या करण्यात ( man dead in Golden temple ) आली आहे.

सुवर्ण मंदिरात चुकीचे कृत्य करण्याचा प्रयत्न शनिवारी एका तरुणाकडून करण्यात आला. या तरुणाला शिरोमणी समितीच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना संतप्त झालेल्या भाविकांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा-Section 144 In Belgaum : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह २७ जणांची हिंडलगा कारागृहात रवानगी

तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती

शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पठण सुरू होते. यावेळी तरुण हा रेलिंग ओलांडून गुरू ग्रंथ साहिबजी जवळ पोहोचला होता. त्याला शिरोमणी समितीच्या टास्क फोर्सने तातडीने थांबवले होते. मात्र, तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर संतप्त भाविकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती -

पोलीस निरीक्षक सुखदेव सिंह म्हणाले, की प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले. तो व्यक्ती कोण होता, याचा तपास सुरू आहे. त्याचा मृत्यू झाला आहे. संत आणि लोकांना विनंती आहे, की शांत राहावे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक परमिंदर सिंग भांडल म्हणाले, की सायंकाळी एक व्यक्ती हरमंदिर साहिबमध्ये घुसला. त्याने गुरु सिरी साहिब ( तलवार ) घेतली. तेव्हा त्याला मारण्यात आले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीचे वय 20 ते 25 वर्षे असावे. त्याला अमृतसरमधील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. उद्या शवविच्छेदन करण्यात येणार आहे. हा व्यक्ती कुठला रहिवासी आहे, याचा तपास सुरू आहे. सीसीटीव्हीदेखील पाहण्यात येणार आहे.

हेही वाचा-JP Nadda on Uttarakhand Election : धामी सरकारच्या कामामुळे जनतेत उत्साह, उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार येईल - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

केंद्र सरकारच्या स्वतंत्र संस्थेकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी केली आहे.

दरम्यान, पवित्र गुरुग्रंथ साहिब सुरक्षित असून गुरुग्रंथाला कोणताही स्पर्श झालेला नाही.

पंजाबमध्ये निवडणुकीचे वारे

पंजाब विधानसभा निवडणुकीत युतीच्या चर्चा होत आहेत. यातच पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री व भाजपाचे पंजाब निवडणूक प्रभारी गजेंंद्र सिंह शेखावत यांची नुकतेच भेट ( Captain Amarinder Singh met Union minister Gajendra Singh Shekhawat ) घेतली. काही दिवसांपूर्वी शेखावत यांनी देखील सिंग यांची भेट घेतली होती. पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पंजाब लोक कॉंग्रेस पार्टी स्थापन केली आहे. पंजाब विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी ( Punjab Assembly Election 2022 ) होणार आहे.

Last Updated : Dec 18, 2021, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.