ETV Bharat / bharat

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासमोर ही आहेत आव्हाने, या ८ कारणांमुळे झाली निवड

author img

By

Published : Jul 28, 2021, 8:48 PM IST

Updated : Jul 29, 2021, 12:31 PM IST

कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना आपल्या कार्यकाळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकांना अजून 2 वर्षांचा अवधी शिल्लक आहे. कालावधी कमी असल्याने त्यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांना वेळ मिळणार नाही. बसवराज यांच्याविषयीचा हा खास वृत्तांत..

basavaraj-bommai
basavaraj-bommai

हैदराबाद - कर्नाटकच्या राजकारणात 28 वर्ष जुनी घटना पुन्हा घडली आहे. 1983 मध्ये जनता पार्टीचे सरकार होते. रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री बनले व त्यांच्या कॅबिनेटमध्ये एस. आर बोम्मई (S.R. Bommai) उद्योगमंत्री होते. अचानक हेगडे यांच्यावर राजकीय नेते व उद्योगपतींचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला. सुब्रमण्यम स्वामी यांनी रामकृष्ण हेगडे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. त्यानंतर कर्नाटकच्या सत्तेत खांदेपालट झाली व एस. आर. बोम्मई कर्नाटकचे 11वे मुख्यमंत्री ( 1988-89) बनले.

new-chief-minister-of-karnataka
बसवराज यांचा परिवार

25 वर्षानंतर काळ पुढ सरकला व तीच घटना पुन्हा घडली. भारतीय जनता पार्टीने 2019 मध्ये बी. एस. येदियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले. कोरोना काळात दोन वर्ष सरकार शांततेत चालले. त्यानंतर अचानक बीजेपी हाईकमांडने राज्यात नेतृत्व परिवर्तन केले अन् बसवराज बोम्मई यांच्याकडे राज्याची सुत्रे सोपवली. ते कर्नाटकचे 23 वे मुख्यमंत्री बनले. 28 जुलै राजी बसवराज यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोन्ही घटनेत साम्य असे आहे, की एक म्हणजे दोन्ही सरकारे गैरकाँग्रेसी होती. दुसरे म्हणजे वडील मुख्यमंत्री झाल्यानंतर 25 वर्षांनी मुलगा मुख्यमंत्री बनला. बसवराज बोम्मई कर्नाटकटचे दिग्गज नेते रहे एस.आर. बोम्मई यांचे पूत्र आहेत. राज्याच्या इतिहासात एच.डी.कुमारस्वामी नंतर बसवराज दूसरे नेते आहेत, ज्यांच्या वडिलांनीही मुख्यमंत्रीपद उपभोगले आहे. एच. डी. कुमारस्वामी यांचे वडील एच. डी देवगौडाही कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

new-chief-minister-of-karnataka
येदियुरप्पा यांचे शिष्य म्हणून बसवराज यांची ओळख

पक्षश्रेष्टींकडून मुख्यमंत्रीपदाची माळ बसवराज यांच्या गळ्यात का ?

१) बसवराज बोम्मई यांची प्रतिमा स्वच्छ आहे. आतापर्यंत त्यांच्यावर भष्टाचाराचा एकही आरोप लागला नाही.

२) बसवराज बोम्मई वीराशैव-लिंगायत समुदायातील आहेत. बी. एस. येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर लिंगायत समुदायाच्या मठाधीशांमध्ये नाराजी होती. लिंगेश्वर मंदिराचे मठाधीश शरन बसवलिंग यांनी इशारा दिला होता, की येदियुरप्पा यांना हटवल्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल.

३) राज्यात सर्वाधिक लोकसंख्या म्हणजे जवळपास 17 ट्क्के लोकसंख्या लिंगायत समाजाची आहे. त्यामुळे आतापर्यंत कर्नाटकचे 8 मुख्यमंत्री याच समाजातील बनले आहेत. राज्यात जवळपास 120 विधानसभा मतदारसंघात या जातीचा प्रभाव आहे. त्यामुळे बीजेपीने लिंगायत नेत्याला सीएम पद देऊन त्यांना नाराज केले नाही.

४) येदियुरप्पा यांनी 31 जुलै 2011 रोजी भाजपचा राजीनामा दिला होता व 30 नोव्हेंबर 2012 ला कर्नाटक जनता पक्षाच्या नावाने नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यावळे भाजपचे अनेक दिग्गज नेते येदियुरप्पा यांच्याबरोबर पक्षसोडून गेले होते. मात्र बसवराज भाजपात राहिले होते. 2008 मध्ये येदियुरप्पा यांनीच त्यांनी भाजपमध्ये आणले होते.

५) येदियुरप्पा यांनीच बसवराज बोम्मई यांचे नाव पक्षश्रेष्ठींना सुचवले होते. येदिंनी लिंगायत मठाचीही बसवराज यांच्यासाठी पसंती मिळवली आहे. त्याचबरोबर बसवराज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ते लोकप्रिय आहे. त्यामुळे बोम्मई केंद्र आणि राज्याच्या समीकरणात फिट बसले.

६) 61 वर्षीय बोम्मई सीएम बनण्यापूर्वी येदियुरप्पा सरकारमध्ये गृह, कानून, संसदीय कामकाज मंत्री यादि विभाग सांभाळत होते. आपल्या मंत्रालयात त्यांनी केंद्राची धोरणे लागू केली व स्वत:ला समाजवादी नेत्यांच्या प्रतिमेतून वेगले केले.

७) बसवराज यांनी विधानसभेत पक्षाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. सर्व पक्षात त्यांचे मित्र आहेत. अनेक वेळा त्यांनी विरोधकांना शांत केले आहे.

८) काँग्रेसला आशा होती की गैर लिंगायत नेत्याला सीएम बनवल्यास ते या वोट बँकेवर कब्जा करतील. बसवराज यांना सीएम करून बीजेपीने न केवळ काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले आहे, तर एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

new-chief-minister-of-karnataka
केंद्र व राज्याच्या समीकरणात फिट बसले बसवराज

कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांसमोरील आव्हाने -

- बसवराज बोम्मई सार्वजनिक जीवनात येदियुरप्पा यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. नव्या सरकारमध्ये येदियुरप्पा यांच्या अनेक जवळच्या नेत्यांना मंत्री बनवले गेले आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांना आपली वेगळी प्रतिमा बनवण्यास कठीण होईल. त्याचबरोबर त्यांना सिद्ध करावे लागेल की, नवीन सरकार त्यांच्याच नेतृत्वात काम करत आहे.

- केंद्र सरकारची धोरणे राज्यात विनाशर्थ लागू करावी लागतील. त्याचबरोबर पक्षश्रेष्टींशी ताळमेळ बसवावा लागेल.

- 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होतील. बसवराज यांना सिद्ध करावे लागेल, की बीजेपी कर्नाटकात त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवू शकते.

- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने खूप हाहाकार माजवला आहे. नव्या सरकारला राजकीय संघर्षातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी तयारी करावी लागेल.

- त्यातबरोबर राज्यात आलेल्या पुराच्या संकटाचाही सामना करावा लागेल.

new-chief-minister-of-karnataka
15 दिवसापूर्वी त्यांच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी बसवराज व त्यांच्या कुटूंबाने अश्रूपूर्ण नयनांनी त्याला श्रद्धांजली दिली होती. हे चर्चेचा विषय बनले होते

कर्नाटकाला मिळाला एक अभियंता मुख्यमंत्री -

28 जानेवारी 1960 रोजी जन्मलेले बसवराज बोम्मई यांनी मॅकेनिकल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे बालपण हुबळीत गेले आहे. त्यामुळे कन्नड़, इंग्रजीसर ते हिंदीही बोलतात. त्यांनी पुण्यात तीन वर्ष टाटा मोटर्समध्ये काम केले आहे त्यानंतर त्यांनी उद्योग स्थापन केला. बोम्मई यांच्या पत्नीचे नाव चेनम्मा आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. बसवराज यांना कर्नाटकमधील सिंचन क्षेत्राचील तज्ञ मानले जाते. त्यांनी राज्यात अनेक सिंचन योजना सुरू केल्या आहेत. त्यांनी आपला विधानसभा मतदारसंघ धारवाडमधील शिगाव येथे 100% पाईप सिंचन परियोजना लागू केली आहे.

राजकीय अनुभव वारसाने मिळाला -

बसवराज बोम्मई राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातील आहेत. त्यांचे वडील एस आर बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्रीय मंत्रीही राहिलेले आहेत. बसवराज 1998 पासून राजकारणात सक्रिय आहेत. दोन वेळा ते विधान परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. 2008 मध्ये ते जेडीयू सोडून बीजेपीत सामील झाले व शिगावमधून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढले. त्यानंतर ते येदियुरप्पा सरकारमध्ये जलसंपदा मंत्री बनले. त्याकाळात अनेक मुख्यमंत्री बदलले मात्र बसवराज 2013 पर्यंत मंत्रीपदी कायम राहिले. 2019 मध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रालयासोबत चार मंत्रालयाचा अधिभार होता.

Last Updated : Jul 29, 2021, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.