ETV Bharat / bharat

3 हजार किलो स्टीलनं बनतंय जगातील सर्वात मोठं रामायण; सेन्सरनं पलटणार 100 किलोचं पानं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 7:55 AM IST

World's largest and heaviest Ramayana : आग्र्यात तीन हजार किलो स्टीलपासून रामायण बनवलं जातंय. शास्त्रीपुरम, आग्रा येथील श्री कृष्ण ग्रंथालय हेरिटेज संस्थेकडून स्टीलवर हे वाल्मिकी रामायण तयार करण्यात येत आहेत.

जगातील सर्वात मोठे वजनदार रामायणाचा मसुदा
जगातील सर्वात मोठे वजनदार रामायणाचा मसुदा

जगातील सर्वात मोठं रामायण

आग्रा World's largest and heaviest Ramayana : आग्रा येथील एक संस्था अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी तीन हजार किलो स्टीलचं वाल्मिकी रामायण तयार करत आहे. या संस्थेनं रामायणाचा 95 किलोचा मसुदा तयार केलाय. श्रीराम मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त ही मोठी रामायण सादर होणार आहे. यात अनेक अद्वितीय वैशिष्ट्ये असणार आहेत.

आजच्या काळात वेद आणि पुराण सुरक्षित ठेवण्यासाठी याची निर्मिती : सत्ययुगापासून ते कलियुगापर्यंत आपल्याला वेद, पुराण आणि रामायणासह इतर ग्रंथांमध्ये देवाच्या निराकार स्वरुपाची कल्पना पाहायला मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात लोक वेद आणि पुराण सुरक्षित ठेवण्यासाठी खूप चिंतित आहेत. या समस्येचं निराकरण करण्यासाठी आग्रा येथील शास्त्रीपुरम येथील श्री कृष्ण ग्रंथालय धरोहर संस्था स्टीलचं वाल्मिकी रामायण तयार करत आहे. या रामायणाचा 95 किलोचा मसुदा संस्थेनं तयार केलंय. त्याचं मोठं रुप अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त सादर केलं जाणार आहे.

कसा आला विचार? : संस्थेच्या सदस्या आराधना सैनी यांनी याबाबत सांगितलं की, "कोरोनाच्या काळात मोकळ्या वेळेत घराची साफसफाई करताना रामायण सापडलं. त्याची पानं फाटली होती. किड लागलेली होती. हे पाहून वाईट वाटलं. पुस्तकावर धातूचं नक्षीकाम का करु नये, असा विचार त्यांनी केला. विचारविनिमय केल्यानंतर संस्थेच्या सदस्यांनी महिनाभराच्या अथक परिश्रमानं रामायणाचा 95 किलोंचा छोटा मसुदा तयार केलाय. या पोलादी रामायणात सात पानं आहेत. त्याच्या प्रत्येक पानावर महर्षी वाल्मिकींच्या रामायणातील चौथरे आणि श्लोक कोरलेले आहेत. हा मसुदा लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.

काय आहेत रामायणाची वैशिष्ट्ये : हीच संस्था अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी भव्य स्टील रामायण बांधत आहे. हे जगातील सर्वात मोठं आणि वजनदार रामायण असेल. संस्थेच्या सदस्या आराधना सैनी यांनी सांगितलं की, "श्रीराम मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त ही संस्था मंदिर ट्रस्टला हे भव्य रामायण स्वरुप सादर करणार आहे. त्याच्या बांधकामासाठी अंदाजे एक कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी रामभक्त व सर्वसामान्यांचे सहकार्य घेतलं जातंय. आग्रा येथील श्री कृष्ण ग्रंथालय धरोहर संस्थेद्वारे जगातील सर्वात मोठं रामायण तयार केलं जातंय. याची स्थापना 2021 मध्ये झाली होती.

असे असणार रामायण

  • रामायणात 30 ते 35 पानं असतील. त्याची लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर 9×5 फुट असेल.
  • प्रत्येक पानाची जाडी 2.5 फूट आणि रुंदी 5 फूट असेल.
  • मसुदाच्या तयारीनंतर मोठ्या रामायणाची निर्मिती सुरू करण्यात आलीय. हे विशेष तंत्रज्ञानानं सुसज्ज असेल.
  • रामायणाचं वजन 3 हजार किलोग्रॅम असेल. त्याच्या एका पानाचं वजन 100 किलो असेल. हे पान सेन्सरच्या मदतीनं फिरवता येईल.

हेही वाचा :

  1. श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी काय परिधान करणार? पाहा कशी असणार वेशभूषा
  2. राम मंदिर उभारणीमुळं 74 टक्के मुस्लिम खूश; नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास, 'या' सर्व्हेतून आलं पुढं
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.