ETV Bharat / bharat

Husband Wife Divorce On Bath : पत्नी दिवसातून ६ वेळा करायची अंघोळ, पतीने घटस्फोटासाठी गाठले न्यायालय

author img

By

Published : Dec 4, 2021, 4:47 PM IST

Updated : Dec 4, 2021, 5:11 PM IST

समुपदेशनानंतर तरुणाच्या पत्नीची अतिस्वच्छतेची सवय कमी ( Obsessive Compulsive Disorder ) झाली. मात्र, त्यांना दुसरे मूल झाल्यानंतर अतिस्वच्छतेची सवय पुन्हा जडली आहे. पत्नी मोबाईल आणि लॅपटॉप धुण्यासाठी ( detergent use to wash laptop ) डिटर्जंट वापरत असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

बंगळुरू - पती-पत्नीमधील घटस्फोटामागे वेगवेगळी कारणे असतात. मात्र, कर्नाटकमध्ये घटस्फोटापर्यंत प्रकरण जाण्याकरिता अजब कारण दिसून आले आहे. पत्नी रोज सहावेळा अंघोळ करत असल्याने तरुण त्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याने घटस्फोटासाठी न्यायालयात ( Husband wants divorce files complaint in Bengaluru ) अर्ज केला आहे.

रोहित आणि सुमती ( बदललेली नावे ) हे दाम्पत्य हे बंगळुरूमधील आरटीनगरमध्ये राहतात. त्या दोघांचा 2009 मध्ये विवाह झाला आहे. रोहित हा तंत्रज्ञ आहे. विवाहानंतर तो लंडनमध्ये गेला होता. त्याची 35 वर्षांची पत्नी सुमती हे एमबीए पदवीधर आहे. ती लंडनमध्ये असताना घर टापटीप ठेवत होती.

हेही वाचा-Kanpur Triple Murder : मानसिक दबावखाली असलेल्या डॉक्टरने केली पत्नीसह दोन्ही मुलांची हत्या

मोबाईल आणि लॅपटॉप धुण्यासाठी डिटर्जंटचा वापर

दोघांना मुल झाल्यानंतर तिची स्वच्छतेची सवय आणखी वाढली. कामावरून घरी आल्यानंतर ती पतीला सतत कपडे, बूट आणि मोबाईल स्वच्छ करण्याची सूचना करत होता. तिच्या वागणुकीमुळे तरुण हा त्रस्त झाला होता. त्यानंतर दोघांनी काही वर्षांपूर्वी भारतात येण्याचा निर्णय घेतला. तिचे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनानंतर तिची अतिस्वच्छतेची सवय कमी झाली. मात्र, त्यांना दुसरे मूल झाल्यानंतर अतिस्वच्छतेची सवय पुन्हा जडली आहे. पत्नी मोबाईल आणि लॅपटॉप धुण्यासाठी डिटर्जंट वापरत असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे.

हेही वाचा-Let Anyone lead Make The Option first नेतृत्व कोणीही करो आधी पर्याय तर उभा करा सामनातून सल्ला

लॉकडाऊनमध्ये बिघडली स्थिती-

2020 मध्ये कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. लॉकडाऊनमध्ये तरुण घरातून काम करत होता. तेव्हा पत्नी लॅपटॉप आणि मोबाईल डिटर्जंटने स्वच्छ करू लागल्याने तरुण त्रस्त झाला. तरुणाची पत्नी चमचे, फर्निचर व घरातील सर्व वस्तू सॅनिटायझर करू लागली. ती दररोज सहावेळा ( Wife takes bath six times in a day ) अंघोळ करते. त्यानंतर प्रत्येकवेळी घरात स्वच्छता करते. तसेच मुलांचे दप्तर आणि शूज रोज स्वच्छ करते. या सर्व प्रकारामुळे तरुणाने घटस्फोट देण्याचा ( divorce due to wife bath ) निर्णय घेतला. आरटी नगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी ही तक्रार बंगळुरूमध्ये महिला सहाय्यता केंद्राकडे सोपविली आहे.

हेही वाचा-Largest Gold Reserve Jamui Bihar : बिहारच्या जमुईत सापडले सोन्याचे सगळ्यात मोठे भांडार

दरम्यान, अतिस्वच्छता हा ओबिसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर (Obsessive Compulsive Disorder ) विकार आहे. त्यासाठी मानसिक उपचार आणि समुपदेशनाची गरज असते. कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या विकाराचे प्रमाण वाढल्याचे ( Mental disorders in corona crisis ) मानसिक रोग तज्ज्ञ सांगतात.

Last Updated :Dec 4, 2021, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.