ETV Bharat / bharat

Let Anyone lead Make The Option first नेतृत्व कोणीही करो आधी पर्याय तर उभा करा सामनातून सल्ला

author img

By

Published : Dec 4, 2021, 11:08 AM IST

यूपीए (UPA)नेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाला ते येणारा काळ ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा (Make The Option first) असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून ( Saamna Editorial) देण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई ( Mamtas Mumbai Visit ) दौऱ्यातील वत्तव्या नंतर हा मुद्दा चर्चेत आह 10 वर्षात काॅंग्रेसच्या घसरलेल्या कामगीरीवरही (The declining performance of the Congress) चिंता व्यक्त केली गेली आहे

Uddhav
उध्दव ठाकरे

शनिवार 4 डिसेबर च्या सामनाच्या अग्रलेखात म्हणले आहे की, काॅंग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असे ऐतिहासिक विधान तृणमूल काॅंग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कोणालाच प्राप्त होत नाहीत. 2024 साली कुणाचे दैव, कोणाचे भाग्य फळफळेल ते सांगता येत नाही. भाजपचा जन्म कायम विरोधी बाकांवरच बसण्यासाठी झाला आहे, अशी टवाळकी पचवून हा पक्ष अवकाशात झेपावला आहे. आज राहुल गांधी, प्रियंका गांधींची राजकीय कुचाळकी सुरूच आहे. राहुल गांधी व प्रियंका अशा कुचाळक्यांना तोंड देत संघर्ष करीत आहेत. यूपीए मेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाचा ते येणारा काळ ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा

पर्याय देण्याच्या बाता करू नयेत

ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटी नंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढ्या सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या एैक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न

काॅंग्रेस संपावी वाटणे हा गंभीर धोका

ममता बॅनर्जी या प. बंगालात एखाद्या वाघिणीप्रमाणे झुंजल्या, लढल्या व जिंकल्या. बंगालच्या भूमीवर भाजपास चारीमुंड्या चीत करण्याचे काम त्यांनी चोख पार पाडले. त्यांच्या संघर्षास देशाने प्रणाम केलाच आहे. ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय गाठीभेटी घेतल्या. ममतांचे राजकारण काॅंग्रेसधार्जिने नाही. प. बंगालातून त्यांनी काॅंग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काॅंग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या फॅसिस्ट राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काॅंग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचा भाग आहे., पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरूध्द लढणाऱ्यांनाही काॅंग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे.

काॅंग्रेसची घसरण चिंताजनक

काॅंग्रेसची गेल्या दाहा वर्षातील घसरण (The declining performance of the Congress) चिंताजनक आहे. या बाबत दुमत नाही. तरीही उताराला लागलेली गाडी पुन्हा वर चढूच द्यायची नाही व काॅंग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक आहेत. काॅंग्रेसचे दुर्दैव असे की, ज्यांनी आयुष्यभर काॅंग्रेसकडून सुख-चैन-सत्ता प्राप्त केली तेच लोक काॅंग्रेसचा गळा दाबत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी 2024 च्या निवडणुकीत काॅग्रेसची कामगिरी चांगली नसेल असा शाप दिला आहे. आजची स्थिती कायम राहिल्यास काॅग्रेसची स्थिती निराशाजनक राहील, असे श्री. आझाद म्हणतात. आझाद वैगेरे मंडळींनी जी 23 नामक असंतुष्टांचा गट स्थापन केला आहे. त्या गटातील जवळ जवळ प्रत्येकाने काॅंग्रेसकडून सत्ता सुख भोगले. मग या गटतील तेजस्वी मंडळाने काॅंग्रेसची आजची स्थिती सुधारण्यासाठी काय केले?

हा एक अपुर्व योगायोग

या तेजस्वी मंडळासही आतून वाटते की, 2024 साली काॅंग्रेसची कामगिरी निराशाजनक व्हावी. जे भाजपास वाटते तेच या मंडळींना वाटते हा एक अपू्र्व योगायोगच म्हणावा लागेल. काॅग्रेसने लोकसभेत शंभरी पार केल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील गेम चेंज होणार नाही. त्यामुळेच भाजपची रणनीती काॅंग्रेसला रोखण्याची असेलच, पण हीचल रणनीती मोदी अखवा भाजप विरोधाच्या मशाली पोटवणाऱ्यांनी ठेवली तर कसे व्हायचे? देशात काॅंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आहेच कुठे ? हा सवाल मुंबईत येऊन ममका बॅनर्जी यांनी विचारला. तो प्रश्नच सध्याच्या स्थितीत लाखमोलाचा आहे. यूपीए अस्तित्वात नाही तसा एनडीएही नाही. मोदी यांच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे. यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे? हा प्रश्न आहे काॅंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपपीए कोणाकोणाला मान्य नाही त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत, स्पष्ट बोलावे. पडद्यामागून गुटरगूं करू नये. त्यातून गोंधळ आणि संशय वाढतो. त्याच प्रमाणे यूपीए चे तुम्ही काय करणार? हे एकदा श्रीमती सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी समोर येऊन सांगायला हवे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे हाच सध्या कळीचा मुद्दा आहे.

युपीएचचे मजबुतीकरण हेच लक्ष्य

यूपीए नसेल तर दुसरे काय ? या चर्चेतच वेळ घालवला जात आहे. ज्यांना विरोधकांची भक्कम आघाडी हवी आहे, त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन यूपीएच्या मजबुतीसाठी प्रयत्न करायला हवेत. एनडीए किंवा यूपीए या आघाड्या अनेक पक्षांच्या एकत्र येण्याने उभ्या राहिल्या. ज्यांना दिल्लीतील सध्याची राजकीय व्यवस्था खरोखर नको आहे, त्यांनी युपीएचचे मजबुतीकरण हेच लक्ष्य ठेवले पाहीजे. काॅंग्रेसशी ज्यांचे मतभेद आहेत ते ठेवूनही यूपीएची गाडी पुढे ढकलता येईल. अनेक राज्यांत आजही काॅंग्रेस आहे. गोवा, ईशान्येकडील राज्यांत तृणमूलने काॅंग्रेस फोडली. पण त्यामुळे तृणमूलचे बळ दोन - चार खासदारांनी वाढले इतकेच. आपचेही तेच आहे. काॅंग्रेसला खेचायचे व आपण चढायचे ही सध्याचया विरोधकांची राजकीय चाणक्यनीती आहे. काॅग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असे ऐतिहासीक विधान तृणमूल काॅंग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कोणालाच प्राप्त होत नाहीत. राजकारणातील घरे, खानदाने, बालेकिल्लेही बघता बघता कोसळून जातात. 2024 साली कुणाचे दैव कोणाचे भाग्य फळफळेल ते सांगता येत नाही. 1978 सालात जनता पक्षाच्या क्रांतिकारक विजयानंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर कधीच येणार नाहीत असा जोश लोकांत होता. भाजपचा जन्म कायम विरोधी बाकांवरच बसवण्यासाठी झाला आहे. अशी टवाळकी पचवून हा पक्ष अवकाशात झेपावला आहे. आज राहुल गांधी, प्रियंका गांधींची राजकीय कुचाळकी सुरूच आहे. राहुल गांधी व प्रियंका अशा कुचाळक्यांना तोड देत संघर्ष करीत आहेत. प्रियंका लखीमपूर खिरीत पोहोचल्या नसत्या तर शेतकऱ्यांच्या खुनाचे प्रकरण रफादफाच झाले असते. हेच विरोधकांचे काम आहे. यूपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाचा ते येणार काळ ठरवेल आधी पर्याय तर उभा करा!असा सल्ला अग्रलेखात दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.