ETV Bharat / bharat

Wife get death certificate संपत्तीसाठी तिने मिळविले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, पतीला धक्का

author img

By

Published : Sep 20, 2022, 8:45 PM IST

Updated : Sep 20, 2022, 8:51 PM IST

पतीची संपत्ती हडपण्यासाठी पत्नीने तो जिवंत असतानाही त्याचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविल्याची घटना ( Wife get death certificate of living husband ) तमिळनाडूमधील शिवगंगाई जिल्ह्यात घडली. हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर शिवगंगाई जिल्ह्यातील या पतीने मृत्यू प्रमाणपत्र आणि कायदेशीर वारस प्रमाणपत्र मिळवून आपण मयत झाल्याचा दावा करत ४० लाखांची मालमत्ता विकणाऱ्या आपल्या पत्नीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

Wife get death certificate of living husband
Wife get death certificate of living husband

शिवगंगाई - चंद्रशेखर हे शिवगंगाई जिल्ह्यातील कराईकुडीजवळील कंदनूर येथे राहतात. त्यांचे किराणा दुकान आहे. त्यांचे आणि कराईकुडी येथील नादिया श्री यांचे २००५ मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, आता आपल्याच पत्नीने आपली फसवणूक केली म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. ( Wife get death certificate of living husband )

वर्ष 2015 मध्ये पत्नी नादिया श्री हिने तिच्या पतीचा मृत्यू झाल्याची नोंद कराईकुडी नगरपालिकेत केली आणि महसूल विभागाकडून मृत्यू प्रमाणपत्र आणि कायदेशीर वारस प्रमाणपत्र मिळवले. याद्वारे तिने पती चंद्रशेखर यांच्या नावे ४० लाख रुपये किमतीची जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली आहे.

चंद्रशेखर यांनी त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांसह तीच जागा विकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांचे मृत्यू आणि इतर प्रमाणपत्रे मिळवून संपत्ती दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचे समोर आले. त्यामुळे पत्नीवर कारवाई करण्यासाठी त्यांनी शिवगंगाई जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. परंतु त्या याचिकेवर कोणतीही कार्यवाही झाली नसून, आता त्यांनी शिवगंगाईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या पत्नीकडून त्यांना सतत धमक्या येत असून त्यांची पत्नी परदेशात जाण्याचा विचार करत आहे. त्यामुळे तिच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर म्हणाले, मी जिल्हाधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली तेव्हा त्यांनी मला पुन्हा याचिका नोंदवण्यास सांगितले आणि याचिका मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी आणि माझ्या पत्नीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Last Updated : Sep 20, 2022, 8:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.