Uttarkashi Tunnel Collapsed : सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी झाला संपर्क; ऑक्सिजन पुरविण्याची केली मागणी

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Nov 13, 2023, 9:57 AM IST

Uttarkashi Tunnel Collapsed

Uttarkashi Tunnel Collapsed : उत्तरकाशी सिलक्यारा बोगदा दुर्घटनेनंतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. बोगद्यात अडकलेल्या लोकांनी ऑक्सिजनची मागणी केलीय. तसंच आतमध्ये प्रचंड दरड कोसळल्याचीही चर्चा आहे.

उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarkashi Tunnel Collapsed : उत्तरकाशी यमुनोत्री महामार्गावर निर्माणधीन बोगद्याच्या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे. उत्तराखंडसह झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल आणि ओडिशातील सुमारे 40 मजूर उत्तरकाशी सिलक्यारा बोगद्यात अडकले आहेत. चांगली बाब म्हणजे बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी संपर्क झाला आहे. घटनास्थळी तैनात पीआरडी जवान रणवीर सिंह चौहान यांनी सांगितलं की, बचावकार्य वेगानं सुरू आहे. संबंधित कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याशिवाय शासन आणि प्रशासनही घटनास्थळी ठाण मांडून आहे.

बोगद्यात अडकलेल्या लोकांशी बोललो : जवान रणवीर सिंह चौहान म्हणाले की, सुरक्षा विभागाच्या लोकांनी बोगद्यात अडकलेल्या लोकांशी चर्चा केली. आमचा आवाज बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचत आहे. ते यापुढं खाद्यपदार्थ पाठवू नका असं सांगत आहेत. तसंच, बोगद्यात अडकलेले लोक उष्णतेबद्दल बोलत आहेत. सध्या बोगद्यात 205 मीटरचे काम सुरू आहे. बोगद्यात अडकलेले लोक 270 मीटरवर आहेत. अजून 65 मीटरचा बोगदा उघडायचा आहे. बघूया बोगदा उघडायला किती वेळ लागतो. बोगद्यात अडकलेले लोक सुखरूप राहावेत, अशी आम्ही देवाकडं प्रार्थना करतो.

बोगद्यात अडकलेल्या लोकांना ऑक्सिजनची मागणी : ते पुढं म्हणाले की सुरुवातीला आम्ही निराश झालो होतो. आत अडकलेल्या लोकांशी संपर्क साधू शकलो नाही. सगळे घाबरले होते. रात्री 11 वाजता बोगद्यात अडकलेल्या लोकांशी संपर्क साधण्यात आल्याचं सांगितलं. आत किती लोक होतं, तेही आम्ही लिहून पाठवलं होतं. तसंच लेखी कागदपत्रं शोधण्याबाबत माहिती दिली. जे अन्न पाठवले होते ते मिळत आहे. ते खाल्ल्याचंही बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी सांगितलं.

  • #WATCH | Uttarakhand | "Work is underway at a great speed. Everyone is working very hard...We were saddened yesterday because we weren't able to communicate with those trapped. But then we were able to communicate with them...," says Ranveer Singh Chauhan, Prantiya Rakshak Dal… https://t.co/xf2QYg7MJD pic.twitter.com/PBqLgJ4Tv5

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पीएम आणि सीएम घटनेवर लक्ष ठेवून : अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याकडून माहिती घेतली. तसंच पंतप्रधान मोदींनी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिलंय. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील या अपघाताची क्षणोक्षणी माहिती घेत आहेत. त्याचबरोबर बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी केंद्रीय यंत्रणांना दिले आहेत.

किती वाजता झाला अपघात : रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सिलक्यारा बोगद्याचा अपघात झाला. यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याच्या सिलक्यारा पासून 230 मीटर अंतरावर मलबा आणि दगड पडले. त्यानंतर 30 ते 35 मीटर परिसरात प्रथम ढिगारा पडला. त्यानंतर अचानक मोठा ढिगारा आणि दगड पडू लागले. ढिगारा आणि दगड पडल्यानं बोगद्यात काम करणारे कामगार आत अडकले आहेत.

  • #WATCH | Uttarakhand | "The work of mucking is underway. Mucking is being done with the loader & excavator...Approximately 30-35 meters part of the tunnel has been broken. The incident happened around 5:30 am. We have information of around 40-45 people being trapped. Everyone is… https://t.co/NoOyfUYbsS pic.twitter.com/RugQihdf9e

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. Explosion in Fireworks Market : फटाका बाजारात भीषण आग, 12 हून अधिक गंभीर, 20 दुकाने जळून खाक
  2. Landslide in Uttarakhand : उत्तराखंडात निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर 36 मजूर अडकले, बचावकार्य सुरू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.